Homeकोल्हापूरबौध्द धम्म म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा मार्ग : भदंत एम.ज्ञानज्योती

बौध्द धम्म म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा मार्ग : भदंत एम.ज्ञानज्योती

गारगोटी/प्रतिनिधी
बौध्द धम्म म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा प्रभावी मार्ग आहे. या मार्गावरूनच सर्वांनी चालावे, असे आवाहन भंते एम. ज्ञानज्योती यांनी केले. कडगाव (ता. भुदरगड) येथे भारतीय बौध्द महासभेच्या तालुका शाखेतर्फे आयोजित वर्षावासाच्या सांगता समारंभात ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महिला तालुकाध्यक्षा आयु. जयंती डी. माने होत्या. प्रारंभी पंचशिलाचे ध्वजारोहण समाजकल्याणचे माजी सभापती गोपाळ कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी समता सैनिक दलाच्या पथकाने ध्वजाला मानवंदना दिली. त्यानंतर भगवान गौतम बुध्द व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांनी केले.

तालुकाध्यक्ष रवी कांबळे यांनी उपस्थित मान्यवरांचे गुलाब पुष्प देवून स्वागत केले. त्यानंतर कडगाव, बेडीव, कारीवडे, अंतिवडे, म्हासरंग, शिवडाव, मिणचे खुर्द, खानापूर या गावांचा वर्षावास कार्यक्रम घेतल्याबद्दल बुध्द अ‍ॅण्ड हिज धम्म हा ग्रंथ देवून सन्मान करण्यात आला. यावेळी भुदरगडमधून नागपूरच्या दिक्षा भूमिला धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त गेलेल्या उपासक व उपासिकांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.

भंते ज्ञानज्योती यांनी धम्माचे आचरण करणे हे सर्वांचे कर्तव्य असल्याचे सांगून धम्माच्या प्रचार, प्रसारासाठी सर्वांनी एक दिलाने काम करावे, असे सांगितले. जयंती माने यांनी धम्म प्रसार करणे काळाची गरज असल्याचे सांगितले. प्रास्ताविक जिल्हासरचिटणीस संजय कांबळे यांनी केले. तर आभार साताप्पा कांबळे (शिवडाव) यांनी मानले.

सुत्रसंचालन सौंदर्या आदित्य हिने केले. कार्यक्रमास प्रा. डी.ए. माने, के.वाय. धम्मरक्षीत, गुलाब लांडगे, एस.व्ही. ऐनीकर, यशवंत सरदेसाई, वंचितचे तालुकाध्यक्ष नारायण कांबळे, जिल्हा सरचिटणीस उर्मिला कांबळे, संजीवनी कांबळे, अक्षय आदित्य, इंद्रायणी धम्मरक्षीत, शिवाजी कांबळे, विनोद कांबळे, राजाराम कांबळे, यशवंत सरदेसाई, भिकाजी मिणचेकर, दलितमित्र पी.एस. कांबळे, व्ही.जे. कदम, एस.के. कांबळे, रमेश दिवेकर, भिकाजी कांबळे, गणपती दिवेकर, माजी सभापती विलास कांबळे, सुभाष कांबळे, बाळासाहेब कांबळे, गोपाळ कांबळे, एस.पी. दिक्षीत, अर्चना पांगिरेकर, मंगल कांबळे, संध्या लांडगे, छाया कदम, डॉ. एम.एस. कांबळे, मनोज कांबळे, उमेश कांबळे, अमृत कांबळे, दीपक कांबळे, अर्जुन आदित्य, राजेंद्र मिणचेकर, भिमराव धर्मवीर यांच्यासह तालुक्यातील बौध्द उपासक, उपासिका व विविध आंबेडकरी पक्ष, संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भुदरगड तालुक्यात पहिल्यांदाच गेल्या तीन महिन्यांपासून भारतीय बौध्द महासभेच्या तालुका शाखेतर्फे आठ गावांमध्ये वर्षावासाचा कार्यक्रम घेण्यात आल्याने वर्षावास कार्यक्रमाचे महत्व बौध्द बांधवांना समजले. यामुळे वर्षावासाच्या सांगता समारंभास तालुक्यातील बौध्द बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याने हा कार्यक्रम अभुतपूर्व उत्साहात पार पडला. यासाठी तालुका शाखेच्या पदाधिकार्‍यांनी कठोर परिश्रम घेतले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -