मेष: गुरुकृपा लाभेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.
वृषभ : दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता. वाहने जपून चालवावीत.
मिथुन : जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल. भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल.
कर्क : हितशत्रुंवर मात कराल. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.
सिंह : मुलामुलींचे प्रश्न मार्गी लागतील. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.
कन्या : प्रॉपर्टी व गुंतवणुकीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. मानसिक स्वास्थ्य लाभेल.
तुळ : नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. जिद्द व चिकाटी वाढेल.
वृश्चिक : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. जुनी येणी वसूल होतील.
धनु : रखडलेली कामे मार्गी लावू शकाल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.
मकर : काहींचा आध्यात्माकडे कल राहील. शत्रुपिडा नाही.
कुंभ : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. अनेकांचे सहकार्य लाभेल. आध्यात्मिक प्रगती होईल.
मीन : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. व्यवसायातील महत्त्वाचे निर्णय मार्गी लागतील.
