Homeमहाराष्ट्रएकदाच रिचार्ज, वर्षभर टेन्शन फ्री! Jio, Airtel की VI; डेटा, कॉलिंग अन्...

एकदाच रिचार्ज, वर्षभर टेन्शन फ्री! Jio, Airtel की VI; डेटा, कॉलिंग अन् किमतीत कोणाचा प्लॅन बेस्ट?

दर महिन्याला मोबाईल रिचार्ज करताना तारीख लक्षात ठेवावी लागते.तर कधीकधी रिचार्ज विसल्यामुळे प्लॅन अचानक संपतात, यामुळे अनेक कामांमध्ये अडचण येते. यामुळे, अनेक युजर्स एका वर्षाच्या व्हॅलिडिटीचे रिचार्ज घेणे पसंत करतात. जिओ, एअरटेल आणि व्होडाफोन आयडिया (Vi) या तिन्ही कंपन्या ३६५ दिवसांच्या व्हॅलिडिटीचे प्लॅन्स देतात. मात्र, त्यांच्या किमती आणि फायदे सारखे नाहीत. काही कंपन्यांकडे कमी किमतीत फक्त कॉलिंगचे प्लॅन्स आहेत, तर काही कंपन्या अधिक डेटा आणि 5जी सुविधा देतात. अशा परिस्थितीत, जर तुम्हालाही एकदा रिचार्ज करून वर्षभराच्या त्रासातून सुटका हवी असेल, तर आधी या तीन कंपन्यांच्या प्लॅन्सपैकी कोणता रिचार्ड प्लॅन बेस्ट आहे, जाणून घ्या.

 

Airtel आणि VI चा १८४९ रुपयांचा प्लॅन सर्वात स्वस्त

 

जर तुम्हाला जास्त मोबाईल डेटाची गरज नसेल आणि फक्त कॉलिंगसाठी तुमचा नंबर अॅक्टिव्ह ठेवायचा असेल, तर तुम्ही एअरटेल आणि व्हीआयचे रु. १,८४९ चे वार्षिक प्लॅन्स पाहू शकता. दोन्ही कंपन्या ३६५ व्हॅलिडिटी देतात. याचा अर्थ असा की, एकदा रिचार्ज केल्यावर तुमचा नंबर संपूर्ण वर्षभर अॅक्टिव्ह राहील.

 

या प्लॅन्समध्ये देशभरातील कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग आणि संपूर्ण ३६५ दिवसांसाठी एकूण ३,६०० एसएमएस मिळतात. मात्र, यामध्ये दैनंदिन वापरासाठी इंटरनेट डेटा दिला जात नाही. ज्या .युजर्सच्या घरी किंवा ऑफिसमध्ये वाय-फाय आहे आणि ज्यांना कमी मोबाईल डेटाची आवश्यकता आहे, त्यांच्यासाठी हे प्लॅन्स उपयुक्त ठरू शकतात.

 

इंटरनेट युजर्ससाठी Jioचा ३,५९९ रुपयांचा प्लॅन

 

जर तुम्ही दररोज मोबाईल इंटरनेट वापरत असाल, तर जिओचा ३,५९९ रुपयांचा वार्षिक प्लॅन तुमच्यासाठी एक पर्याय असू शकतो. यामध्ये ३६५ दिवसांच्या व्हॅलिडिटीसह दररोज २.५ GB हाय-स्पीड डेटा मिळतो. तसेच, कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएस मेसेजेसची सुविधाही मिळते.

 

या प्लॅनमध्ये JioTV आणि JioAICloud सारख्या ॲप्सचा ॲक्सेस देखील मिळतो. पात्र युजर्सना जिओचे 5G नेटवर्क उपलब्ध असलेल्या भागांमध्ये अनलिमिटेड 5G डेटाचा लाभही घेता येईल. जास्त डेटा वापरणाऱ्यांसाठी हा प्लॅन उपयुक्त ठरू शकतो.

 

एअरटेलच्या ३,५९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये दररोज २ GB डेटा

 

एअरटेलकडे ३,५९९ रुपयांचा वार्षिक रिचार्ज प्लॅन देखील आहे. त्याची व्हॅलिडिटी ३६५ दिवसांची आहे. युजर्सना दररोज २ GB हाय-स्पीड डेटा, देशभरात अनलिमिटेड लोकल आणि एसटीडी कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएस मिळतात. पात्र युजर्सना या प्लॅनअंतर्गत अनलिमिटेड 5G डेटाचा लाभही घेता येईल. परंतु, हे नेटवर्कच्या उपलब्धतेवर आणि कंपनीच्या अटी आणि शर्तींवर अवलंबून असेल. त्यामुळे, एअरटेल वापरकर्त्यांनी रिचार्ज करण्यापूर्वी आपल्या परिसरात 5G नेटवर्कची उपलब्धता तपासावी.

 

Vi कडे ३,४९९ रुपये आणि ३,५९९ रुपयांचे दोन वार्षिक प्लॅन्स

वोडाफोन आयडियाकडे (Vi) ३६५ दिवसांच्या व्हॅलिडिटीसह ३,४९९ आणि ३,५९९ रुपयांचे दोन प्लॅन्स आहेत. ३,४९९ च्या प्लॅनमध्ये दररोज १.५ GB डेटा मिळतो, तर ३,५९९ च्या प्लॅनमध्ये दररोज २ GB डेटा मिळतो.

 

या प्लॅनअंतर्गत, युजर्सना रात्री १२ ते सकाळी ६ वाजेपर्यंत अनलिमिटेड नाईट डेटा मिळतो. विशेष गोष्ट म्हणजे, या वेळेत वापरलेला डेटा दैनंदिन डेटा मर्यादेतून वजा होत नाही. जे लोक रात्रीच्या वेळी भरपूर व्हिडिओ पाहतात, डाउनलोड करतात किंवा इंटरनेट वापरतात, त्यांच्यासाठी हे वैशिष्ट्य फायदेशीर ठरू शकते.

 

कोणत्या कंपनीची वार्षिक प्लॅन तुमच्यासाठी अधिक चांगली?

 

जर तुम्हाला फक्त कॉल करायचे असतील आणि तुमचे सिम पूर्ण वर्षभर चालू ठेवायचे असेल, तर एअरटेल आणि व्हीआयचा १,८४९ रु. चा प्लॅन कमी किमतीत एक चांगला पर्याय आहे. जर तुम्हाला दररोज जास्त डेटा हवा असेल, तर जिओच्या ३,५९९ रु. च्या प्लॅनमध्ये दररोज २.५ GB डेटा मिळतो. एअरटेलच्या ३,५९९ रु. च्या प्लॅनमध्ये दररोज २ GB डेटा मिळतो.दुसरीकडे, जे लोक रात्रीच्या वेळी जास्त इंटरनेट वापरतात त्यांच्यासाठी Vi चे ३,४९९ रु किंवा ३,५९९ रु. चे प्लॅन्स उपयुक्त ठरू शकतात.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -