Homeमहाराष्ट्रआयसीएसईच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर, असं आहे संपूर्ण वेळापत्रक

आयसीएसईच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर, असं आहे संपूर्ण वेळापत्रक

आयसीएसईच्या २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठीच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर झालं आहे. या वेळापत्रकानुसार आयसीएसईच्या बारावीच्या परीक्षा ९ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहेत. दहावीच्या परीक्षेला १५ फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे.

 

प्रसिद्ध करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार आयसीएसईची इयत्ता बारावीची परीक्षा ९ फेब्रुवारीला सुरू होऊन ती ८ एप्रिलपर्यंत चालणार आहे. तर आयसीएसईची दहावीची परीक्षा १५ फेब्रुवारीला सुरू होऊन ३१ मार्चपर्यंत चालणार आहे.

 

आयसीएसईच्या दोन्ही इयत्तांचे मिळून सुमारे ३ लाख ७९ हजार ९८० विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. यावर्षी सुमारे ३ हजार १०६ संलग्न शाळांमधील २ लाख ७० हजार विद्यार्थी आयसीएसईची परीक्षा देणार आहेत. तर १ हजार ६५१ संलग्न शाळांमधील १.१ लाखांहून अधिक विद्यार्थी आयएससीची परीक्षा देणार आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -