मेष: व्यवसायाची उलाढाल वाढेल. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.
वृषभ : आपल्या मतांविषयी आग्रही राहाल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.
मिथुन : वाहने जपून चालवावीत. प्रवास शक्यतो टाळावेत.
कर्क : अनेकांचे सहकार्य लाभेल.उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल.
सिंह : तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.
कन्या : गुरुकृपा लाभेल. एखादी भाग्यकारक घटना घडेल.
तूळ : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. खर्चाचे प्रमाण वाढेल.
वृश्चिक : भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल. प्रवास सुखकर होतील.
धनू : काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्यावेत.
मकर : काहींचे वैचारिक परिवर्तन होईल. आरोग्य उत्तम राहील.
कुंभ : तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.
मीन : एखादी महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल. नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील.
