Sunday, December 22, 2024
Homeकोल्हापूरकोल्हापूर जिल्ह्यात आणखी ४२४ कोरोना रुग्ण

कोल्हापूर जिल्ह्यात आणखी ४२४ कोरोना रुग्ण

ताजी बातमी ऑनलाइन टीम
जिल्ह्यातील वाढत्या कोरोना बाधित रुग्णसंख्येमुळे चिंतेत भर पडली आहे. दिवसागणीक रुग्णसंख्या वाढत आहे. गेल्या 24 तासांत 424 बाधितांची भर पडली. यामध्ये शहरातील 237 जणांचा समावेश आहे. येथील खासगी रुग्णालयात कोरोनाचे उपचार घेणार्‍या सांगली जिल्ह्यातील 83 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला. शासकीयसह खासगी रुग्णालयांत बाधित 165 जणांवर उपचार सुरू आहेत.

जिल्ह्यातील कोरोनाची एकूण सक्रिय रुग्णसंख्या 2 हजार 241 वर पोहोचली आहे. इचलकरंजी नगरपालिका कार्यक्षेत्रात 27 नवे बाधित आढळले असून, येथील एकूण बाधित संख्या 12 हजार 212 अशी झाली आहे. अन्य बाधितांमध्ये आजरा, गडहिंग्लज तालुक्यांत प्रत्येकी 7, भुदरगड, कागल तालुक्यांत प्रत्येकी 6, चंदगड 2, हातकणंगले तालुक्यात 30, करवीर 33, पन्हाळा, शाहूवाडी तालुक्यांत 13, राधानगरी 4, शिरोळ तालुक्यांतील 14 जणांचा समावेश आहे.

नगरपालिका कार्यक्षेत्रात जयसिंगपूर 6, कुरूंदवाड 2, गडहिंग्लज 2, कागल, मलकापूर, पेठवडगाव येथे प्रत्येकी 3 जणांना कोरोना संसर्ग झाला आहे. अन्य जिल्ह्यांतील मुंबई, सिंधुदुर्ग, औरंगाबाद, सांगली, लातूर, धुळे, कर्नाटक राज्यातील प्रत्येकी एका व्यक्‍तीचा समावेश आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -