ताजी बातमी ऑनलाइन टीम
राज्यातील सर्व शाळा सोमवारपासून सुरू होत आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील शाळा मात्र २५ जानेवारी म्हणजेच मंगळवारपासून सुरु करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहूल रेखावार (collector) यांनी बैठकीत दिले आहेत.
राज्यातील कोरोना संसर्ग कमी झाल्यानंतर चार ऑक्टोबरपासून शाळा, महाविद्यालये सुरु करण्यास शासनाने परवानगी दिली होती. मात्र मागील काही दिवसांपासून कोरोना आणि ओमायक्रॉनच्या वाढत्या रुग्णसंख्या पाहता जिल्हाधिकार्यांच्या (collector) आदेशानुसार दहा जानेवारीपासून जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये 15 फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्यात आले होते.
जिल्ह्यातील शाळा मंगळवारपासून सुरु करण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे. दरम्यान कोल्हापुरात एकूण महापालिकेच्या 58 शाळा असून याद्वारे 10 हजार 200 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
कोरोना नियमांचे पालन करत शाळा सुरु कराव्या असेही त्यांनी या बैठकीत सांगितले आहे. शाळा व्यवस्थापन समितीची बैठक घेण्यात यावी, कोरोना रुग्ण जास्त असेल त्याठिकाणी शाळा सुरू करताना विद्यार्थी सुरक्षेचा विचार करावा, कमी पटाच्या शाळा शंभर टक्के सुरू करता येतील, जास्त पटसंख्या असलेल्या शाळा शिफ्टमध्ये चालवाव्यात, शाळा सुरू करताना शाळा स्वच्छता, सॅनिटायझेशन, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात यावे, अशा सूचना बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. मात्र, महाविद्यालये सुरू करण्याबाबत अद्याप शासनस्तरावरून निर्णय झालेला नाही.
कोल्हापूर जिल्हाधिकारी यांनी दिले महत्वाचे आदेश….
RELATED ARTICLES
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -