राष्ट्रगीताने दिवसाची सुरुवात करणारे गाव जिल्ह्यात आहे. महापुरात पूर्णपणे पाण्याखाली जाणार्या ‘भिलवडी’ गावाने आता राज्यासमोर किंबहुना देशासमोर राष्ट्रगीताचा आदर्श घालून दिला आहे. सध्या सर्वत्र याची जोरदार चर्चा आहे.
जेमतेम पंधरा हजार लोकसंख्या असलेले हे गाव महापुरात चांगलेच चर्चेत असते. प्रत्येक वर्षी येणार्या महापुरामुळे गाव पूर्णत: पाण्याखाली जाते. सन 2019 अणि 2021 मध्ये आलेल्या महापुराने या गावाचे होत्याचे नव्हते केले होते. परंतु महापुरामुळे आलेली ती प्रसिद्धी पुसून एक आदर्श गाव म्हणून नावारुपास येण्यासाठी भिलवडीमधील व्यापारी संघटनेचे समन्वयक दीपक पाटील व त्यांच्या सहकार्यातून या राष्ट्रगीताच्या संकल्पनेचा उदय झाला आहे.
सकाळची कामे आटोपून गावातील काही वरिष्ठ मंडळी स्टँडजवळ जमतात. तेथेच एका इमारतीवर स्पीकर बसविण्यात आला आहे. रस्त्यावरून जाणारे-येणारे, महाविद्यालयीन विद्यार्थी, व्यापारी यांचा देखील याच रस्त्यावर राबत असतो. त्यामुळे स्पिकरसाठी हीच जागा निश्चित करण्यात आली आहे.