Friday, November 22, 2024
Homeआरोग्यCovishield आणि Covaxin आता हॉस्पिटलमध्ये उपलब्ध होणार ! DCGI ने दिली परवानगी

Covishield आणि Covaxin आता हॉस्पिटलमध्ये उपलब्ध होणार ! DCGI ने दिली परवानगी

काही निर्बंध घालून बाजारामध्ये कोविशील्ड आणि कोव्हॅक्सिन या लसींना DCGI ने विकण्यासाठी गुरूवारी मान्यता दिली आहे. या निर्णयाने कोरोनाची लस लवकरच दुकानांमध्ये उपलब्ध होईल असे नाही. तथापि, रुग्णालये आणि दवाखाने लस विकत घेऊन टोचू शकतील. सूत्रांनी गुरुवारी ही माहिती दिली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोन्ही लसी दुकानात उपलब्ध होणार नाहीत. केवळ खासगी रुग्णालये आणि दवाखाने लस खरेदी करू शकतील आणि त्या दिल्या जातील.

तसेच, खासगी हॉस्‍पिटलमध्ये आतापर्यंत कोव्हॅक्सिनची किंमत प्रति डोस 1200 रू तर कोव्हीशिल्डची किंमत 780 रू प्रति डोस आहे. या किंमतीमध्ये 150 रू इतके सर्व्हिस चार्ज लावण्यात आला आहे. देशात या दोन्ही लसीचा उपयोग हा आपत्कालीन वापरासाठी करण्यात येत आहे. केंद्रीय औषधी मानक नियंत्रण यांचेकडून कोविड 19 वर तज्ज्ञ समितीने 19 जानेवारी रोजी कोव्हीशील्ड आणि कोव्हॅक्सिनला प्रौढांसाठी काही निर्बंधासह नियमित विक्रीसाठी मंजुरी देण्याची शिफारस केली आहे.

नवीन औषधे आणि क्लिनिकल चाचण्या नियम, 2019 अंतर्गत मान्यता देण्यात आली आहे. कंपनीना क्लीनिकल चाचणी प्रशिक्षणाचा डेटा ही दयावा लागेल. तसेच लस घेतल्‍यानंतर त्‍याच्या होणा-या परिणाम बघणे गरजे राहणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -