भाजप आमदार नितेश राणे यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेला अर्ज मागे घेतला आहे. ते आज कणकवली न्यायालयात शरण आले आहेत. न्यायालयात तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयाने राणे यांचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर राणे यांच्या वतीने अँड. सतीश माने शिंदे यांनी उच्च न्यायालयात अर्ज केला होता. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर राणे १० दिवसात न्यायालयासमोर शरण येण्याची संधी दिली होती.