Monday, December 23, 2024
Homeमहाराष्ट्रमहिलेकडे पाहून अश्लील हावभाव, प्रायव्हेट पार्ट्सही दाखवले;संतापजनक प्रकार

महिलेकडे पाहून अश्लील हावभाव, प्रायव्हेट पार्ट्सही दाखवले;संतापजनक प्रकार

महिलेकडे पाहून अश्लील हावभाव करत लैंगिक अवयव दाखवल्या प्रकरणी तरुणाला अटक करण्यात आली आहे. मुंबईतील लोअर परळ रेल्वे स्थानकावर सोमवारी हा प्रकार घडला होता. पोलिसांनी 32 वर्षीय आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. लोअर परळ रेल्वे स्टेशनवर उभ्या असलेल्या महिलेसोबत दोन दिवसांपूर्वी हा धक्कादायक प्रकार घडला होता. रेल्वे स्टेशनसारख्या गजबजलेल्या परिसरात दिवसा ढवळ्या हा प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे. आरोपीने त्याचे प्रायव्हेट पार्ट दाखवत महिलेकडे अश्लील हावभाव केल्याचा आरोप आहे. शमशाद मुमताज अन्सारी असे आरोपीचे नाव असून तो कुर्ल्यातील इंदिरा नगर येथील रहिवासी आहे. महिला आणि तिच्या भावाने आरोपीचा पाठलाग करत त्याला पोलिसांच्या हवाली केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -