बॉलिवूडचा सुपरस्टार हृतिक रोशन (Hrithik Roshan) त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे सध्या चर्चेत आहे. हृतिक आणि मिस्ट्री गर्ल सबा आझादसोबतच्या डिनर डेटिंगच्या अफवांमुळे चर्चेला उधाण आलं आहे. सबा २०११ मध्ये रोमँटिक कॉमेडी ‘मुझसे फ्रेंडशिप करोगे’ चित्रपटामध्ये दिसली होती. हृतिक मिस्ट्री गर्ल सबासोबत पुन्हा एकदा टाईम्स पेंन्ड करताना दिसला. दोघांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
फेसबूक देत आहे विनातारण 2 ते 50 लाखापर्यंत कर्ज ! व्हिडिओ पहा
हृतिक आणि सबा नुकतेच दोघेजण एका रेस्टॉरंटमधून बाहेर पडताना दिसले आहेत. यावेळी सबा हृतिकच्या मागे- मागे चालत होती. रेस्टॉरंटच्या दरवाज्याजवळ येताच हृतिकने आपला हात सबाच्या हातात दिला आणि दोघेजण गाडीकडे येताना दिसले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. यातील व्हिडिओतील खास म्हणजे, सबाने केसांच्या मदतीने आपला चेहरा लपवल्याचे दिसत आहे. यात हृतिक मात्र स्पष्ट दिसत आहे.