नागपुरात दहावीच्या विद्यार्थ्याचा अपघात झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. दहावीची तोंडी परीक्षा देऊन परत येताना विद्यार्थ्यावर काळाने घाला घातला. विद्यार्थ्यांच्या दुचाकीला एका वाहनाने जोरदार धडक दिली होती. यामध्ये बाईकवरील विद्यार्थी जागीच मृत्युमुखी पडला, तर इतर दोघे जण जखमी झाले आहेत. कामठी-नागपूर मार्गावर मोहंमद अली पेट्रोल पंपासमोर ही घटना घडली. दिशांत महादेव पटेल असं मयत विद्यार्थ्याचं नाव आहे. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. मयंक कुमार सिंग आणि आरव चौधरी हे विद्यार्थी अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. अपघात झालेले सर्व विद्यार्थी जीपीएस आर्मी पब्लिक स्कूलचे आहेत.
या दिवशी रिलीज होणार सलमान खानचा ‘टायगर 3’
नागपुरात दहावीच्या तिघा विद्यार्थ्यांचा रस्त्यात अपघात झाल्याचं उघडकीस आलं आहे. कामठी-नागपूर मार्गावर मोहंमद अली पेट्रोल पंपासमोर ही घटना घडली. दहावीची तोंडी परीक्षा देऊन परत येताना ही घटना घडली.