सध्या संपूर्ण देशाचे लक्ष पाच राज्यांच्या निवडणूक निकालाकडे लागले आहे. या पाचही राज्यातील निकालचे चित्र हळूहळू स्पष्ट होऊ लागले आहे. आम आदमी पार्टीने पंजाब विधानसभा निवडणूक निकालामध्ये चांगलीच जादू केल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. तर उत्तरप्रदेश , गोवा (Goa), उत्तराखंड आणि मणिपूरमध्ये भाजपची सत्ता मिळवण्याच्या दिशेने वाटचाल सुरु आहे. अवघ्या काही तासांमध्येच या पाचही राज्यांच्या निकालाचे चित्र स्पष्ट होईल.
शिरढोण येथील भीषण अपघातात महिला ठार
अशामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी या पाचही राज्यांच्या निकालावर प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार यांनी दिल्लीतील कामगिरीमुळेच पंजाबमध्ये आपचा विजय झाला असल्याचे म्हटले आहे.
पाच राज्याच्या निवडणूक निकालाबाबत बोलताना शरद पवार यांनी सांगितले की, ‘दिल्लीतल्या कामगिरीमुळे पंजाबमध्ये आपचा विजय झाला आहे. दिल्लीत दिलेल्या सुविधांमुळेच पंजाबने आपला स्वीकारलं आहे. शेतकरी आंदोलनादरम्यान पंजाबमधील बहुतांश शेतकरी दिल्लीत होते याचा परिणाम निवडणुकीत पहायला मिळाला आहे.
पंजाबमधील शेतकऱ्यांच्या मनात केंद्र सरकारविषयी राग होता. दिल्लीतील माझ्या बंगल्यातील कर्मचाऱ्यांन देखील आपलाच मतं दिली होती. त्यामुळे जनतेने दिलेल्या कौलाचा आदर केला पाहिजे.’ तसंच, ‘सर्व विरोधक चर्चा करुन भाजपाला पर्याय देण्या