ताजी बातमी ऑनलाइन टीम
सांस्कृतिक नगरी म्हणून ओळखलं जाणारं डोंबिवली शहर वाढत्या गुन्हेगारीमुळे बदनाम झालं आहे. आता येथील रेल्वे स्टेशनवरच भर माणसांच्या गर्दीत तरुणाईचं प्रेम फुलू लागल्यानं संताप व्यक्त होत आहे.
डोंबिवली स्टेशनवर एक जोडपं किसिंग करताना दिसून येत आहे. त्यांना किसिंग कार्यक्रम करताना आजूबाजूचे भान नसल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. मराठमोळ्या डोंबिवलीमध्ये साधारण दुपारची वेळी डोंबिवली रेल्वे स्टेशनवर त्या दोघांना कसलचं भान राहिलं नव्हतं.
भर गर्दीत महाविद्यालयीन तरुण आणि तरुणीचा रोमान्स सुरू झाला. हा रोमान्स पाहून उपस्थित प्रवाशांच्याही भुवया उंचावल्या. काही केल्या तरुण तरुणीचे अश्लील चाळे थांबत नव्हते. त्यामुळे संतापलेल्या काही नागरिकांनी हा रोमान्स आपल्या कॅमेरात कैद केला आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला.
वाढत्या गुन्हेगारीमुळे बदनाम झालेल्या डोंबिवलीत आता असे प्रकार पण खुल्लमखुला होत असल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मिडियावर चर्चेचा विषय झाला आहे.