Sunday, December 22, 2024
Homeकोल्हापूरजोतिबाच्या चौथ्या खेटेला दोन लाख भाविक

जोतिबाच्या चौथ्या खेटेला दोन लाख भाविक

ताजी बातमी ऑनलाइन टीम


जोतिबा,चांगभलंच्या गजरात मोठ्या धार्मिक उत्साहात भाविकांनी जोतिबाचे दर्शन घेतले. जोतिबाच्या खेटे यात्रेचा चौथा रविवार होता. शनिवार पासून प्रशासनाने ईपास दर्शन | व्यवस्था बंद केली असून दर्शनासाठी मंदिराचे चारही दरवाजे उघडण्याचा निर्णय घेतल्यामुळे लाखो भाविकांनी देव दर्शनाचा लाभ घेतला.


गुलाल खोबऱ्याची उधळण करत चांगभलंच्या गजरात दोन लाखाहून अधिक भाविकांनी जोतिबा दर्शनाचा लाभ घेतला.माघ पौर्णिमेनंतर येणाऱ्या रविवार पासून न ज्योतिबाच्या खेटे यात्रेला सुरुवात होते. पहाटे चार वाजता . घंटानाद करून मंदिराचे दरवाजे भाविकांसाठी खुले करण्यात गे आले. सकाळी अभिषेक, सकाळी ११ वाजता धुपारती ले तसेच इतर नित्य धार्मिक विधी मंदिरात संपन्न झाले. चौथा खेट्या निमित्त श्री जोतिबाची सरदारी रूपातील अलंकारिक खडी पूजा बांधण्यात आली.

लाखो भाविकांनी चांगभलंच्या गजरात गुलाल खोबऱ्याची उधळण करत जोतिबाच्या दर्शनाचा लाभ घेतला.
चौथ्या खेट्याच्या दिवशी ई पास दर्शन व्यवस्था बंद केल्या मुळे भाविकांनी जोतिबा डोंगरावर प्रचंड गर्दी केली होती. बदललेल्या नवीन नियमानुसार भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. पन्हाळचे तहसिलदार रमेश शेंडगे, देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवडे यांनी मंदिरातील दर्शन रांगेची पाहणी करून काही सूचना व उपाय सांगितले. भाविकांनी जोतिबाला नैवेद्य दाखवून दर्शनाचा लाभ घेतला. महाराष्ट्र, कर्नाटकातून भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. रात्री पालखी सोहळा झाला. आजच्या चौथा खेट्यालाही घोड्या विना धुपारती, पालखी सोहळा झाला. कोडोली पोलिस ठाणेच्या वतीने मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -