Friday, November 8, 2024
Homeराजकीय घडामोडीनुसता टॅक्स फ्री कशाला? ‘द काश्मीर फाईल्स’ यूट्यूबवर टाका सगळ्यांना मोफत बघता...

नुसता टॅक्स फ्री कशाला? ‘द काश्मीर फाईल्स’ यूट्यूबवर टाका सगळ्यांना मोफत बघता येईल- Arvind Kejriwal

‘द काश्मिर फाईल्स’  या चित्रपटावरुन सध्या देशाचं राजकारण आणि समाजकारण ढवळून निघालंय. सामाजिक क्षेत्रासोबतच राजकीय मंडळीही या सिनेमाबाबत बोलताना दिसत आहेत. अश्यातच आता दिल्लीच्या विधानसभेतही  या सिनेमावर चर्चा झाली. दिल्लीतही भाजपकडून द काश्मिर फाईल्स करमुक्त करण्याची मागणी करण्यात आली. त्यावरुन विधानभेत बोलताना आम आदमी पक्षाचे अध्यक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आपलं मत मांडलं. “टॅक्स फ्री करण्यापेक्षा हा सिनेमा यूट्यूबवर टाका सगळ्याना तो मोफत पाहता येईल”, असं केजरीवाल म्हणालेत.

‘द काश्मिर फाईल्स’ या चित्रपटाला मिळणारा लोकांचा प्रतिसाद आणि कमाईच्या आकड्यांवरुन सध्या रोजदार चर्चा होतेय. काही भाजपशासित राज्यात हा चित्रपत करमुक्त करण्यात आलाय. दिल्लीतही भाजपकडून द काश्मिर फाईल्स करमुक्त करण्याची मागणी करण्यात आली. त्यावरुन विधानभेत बोलताना आम आदमी पक्षाचे अध्यक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार निशाणा साधलाय. “8 वर्ष देश चालवल्यानंतर जर कुठल्या पंतप्रधानांना विवेक अग्निहोत्रीच्या पायाशी लोळण घ्यावे लागले, तर त्याचा अर्थ होतो की 8 वर्षे त्या पंतप्रधानांनी काहीही काम केलेलं नाही”, अशा शब्दात केजरीवाल यांनी मोदींवर हल्ला चढवला.

याचा अर्थ मोदींनी 8 वर्षात काहीच काम केलं नाही- केजरीवाल

अरविंद केजरीवाल यांनी नरेंद्र मोदी यांच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. “संपूर्ण भारतीय जनता पार्टी देशभरात एका चित्रपटाचे पोस्टर लावत आहे. असे चित्रपटाचे पोस्टर लावण्यासाठी तुम्ही राजकारणात आले होते काय? तुमच्या मुलांना काय उत्तर द्याल घरी जाऊन? मुलं विचारतील बाबा काय काम करता? त्यांना सांगाल का चित्रपटाचे पोस्टर लावतो म्हणून. 8 वर्ष देश चालवल्यानंतर जर कुठल्या पंतप्रधानांना विवेक अग्निहोत्रीच्या पायाशी लोळण घ्यावे लागले, तर त्याचा अर्थ होतो की 8 वर्षे त्या पंतप्रधानांनी काहीही काम केलेलं नाही. 8 वर्षे खराब केले. विवेक अग्निहोत्रीच्या पायाशी त्यांना लोळण घ्यावं लागत आहे की, वाचव वाचव म्हणून…” अशा शब्दात अरविंद केरजीवाल यांनी द काश्मिर फाईल्सच्या मुद्द्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार निशाणा साधलाय.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -