Friday, March 27, 2026
Homeब्रेकिंगशरद पवार यांच्यावर उपचार सुरू, हॉस्पिटलमधून रोहित पवारांचे मोठे आवाहन; म्हणाले सर्वांना...

शरद पवार यांच्यावर उपचार सुरू, हॉस्पिटलमधून रोहित पवारांचे मोठे आवाहन; म्हणाले सर्वांना विनंती की…

खासदार शरद पवार यांची प्रकृती सध्या बिघडली आहे. कफ झाल्यामुळे त्यांना श्वसनाचा त्रास होत आहे. याच कारणामुळे त्यांना बारामतीतून तातडीने पुण्यातील रुबी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांनी त्यांच्या प्राथमिक तपासण्या केल्या आहेत. असे असतानाच आता पवार कुटुंबातील सदस्य तथा आमदार रोहित पवार यांनी शरद पवार यांच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची अपडेट दिली आहे. सोबतच त्यांनी राज्यभरातील राष्ट्रवादी पक्षाच्या (शरद पवार गट) नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना कोणीही पुण्यात शरद पवार यांना भेटण्यासाठी येऊ नये, असे आवाहन केले आहे.

 

 

रोहित पवार यांनी नेमकी काय माहिती दिली?

शरद पवार यांनी रुबी रुग्णालयाच्या बाहेर माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी बोलताना शरद पवार यांच्या प्रकृतीबाबत चिंता करण्याचे कारण नाही, असे त्यांनी सांगितले आहे. “मी सर्व कार्यकर्त्यांना विनंती करतो की कोणीही हॉस्पिटलला येऊ नये. रुग्णालयात इतरही काही रुग्ण आहेत. डॉक्टरांनी सांगितले सांगितल्याप्रमाणे शरद पवार हे आयसीयूमध्ये नाहीयेत. एका प्रायव्हेट रुममध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मी स्वत:चर्चा करून आलेलो आहे. त्यामुळे चिंतेचं कोणतंही कारण नाहीये. गेल्या 12 ते 13 दिवसांत शरद पवार यांचा शारीरिक ताण वाढला आहे,” असे रोहित पवार यांनी सांगितले.

 

दोन दिवस रुग्णालयात ठेवलं जाणार?

तसेच, पवार साहेब यांना कफ झालेला आहे. पुढच्या काही काळात रिपोर्ट येतील. माझ्या अंदाजाप्रमाणे शरद पवार साहेबांना रुग्णालयातच एक ते दोन दिवस ठेवलं जाईल. कृपा करून इतर रुग्णांच्या हितासाठी कोणीही रुग्णालयात येऊ नये. पवार साहेबांशी कोणालाही भेटता येणार नाही, अशी माहितीही त्यांनी दिली.

 

उपचारासाठी मुंबईत नेले जाणार का?

या रुग्णालयाचे जे नियम आहेत ते योग्य पद्धतीने पाळले पाहिजे, असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले आहे. तपासणीचे रिपोर्ट समोर आल्यावरच शरद पवार यांच्यावर पुण्यातच उपचार केले जाणार की त्यांना मुंबईत नेले जाणार हे ठरवले जाईल, असेही यावेळी रोहित पवार यांनी स्पष्ट केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -