Monday, December 23, 2024
Homeब्रेकिंगGold, silver prices : सोन्याच्या दरात आज पुन्हा तेजी

Gold, silver prices : सोन्याच्या दरात आज पुन्हा तेजी

सोन्याच्या दरात आठवड्याच्या शेवटच्या दिवशी पुन्हा एकदा वाढ झाली आहे. गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार दहा ग्रॅम अर्थात प्रति तोळा सोन्याची किंमत आज बाजार सुरू होताच 47950 रुपयांवर पोहोचली आहे. गुरुवारी बाजार प्रति तोळा 47350 रुपयांवर बंद झाला होता. याचाच अर्थ आज सोन्याच्या दरात प्रति तोळ्यामागे 600 रुपयांची वाढ झाली आहे. तर आज चांदीचा भाव 68500 रुपये इतका आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्याने चढ -उतार सुरू असल्याचे पहायला मिळत आहे. रशिया (Russia) आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा जागरिक बाजारपेठेवर परिणाम झाला असून, काही दिवसांपूर्वी सोन्याच्या किमती चांगल्याच कडाडल्या होत्या, मात्र त्यानंतर त्यामध्ये घसरण पहायला मिळाली. आज पुन्हा एकदा सोन्याचे दर सहाशे रुपयांनी वाढेले आहेत. सोन्याच्या दरात सातत्याने चढ- उतार पहायला मिळत असल्याने गुंतवणूकदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. आज आर्थिक राजधानी मुंबईमध्ये सोन्याचे दर प्रति तोळा 47950 इतके आहे. तर चांदीचा (silver)दर 68500 प्रति किलो इतका आहे.

गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार मुंबईमध्ये 22 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 47950 इतका आहे. तर 24 कॅरट सोन्याचा दर 52,310 इतका आहे. पुण्यात आज 22 कॅरट सोन्याचा भाव 48050 इतका आहे, तर 24 कॅरट सोन्याची किंमत 52,3 50 इतकी आहे. नागपूरमध्ये 22 आणि 24 कॅरट सोन्याचा प्रति तोळा दर अनुक्रमे 48020 आणि 52330 रुपये इतका आहे. तर चांदीचा दर प्रति किलो 68500 रुपये इतका आहे. कालच्या तुलनेमध्ये आज सोने सहाशे रुपयांनी वधारले आहे.

रशिया आणि युक्रेन युद्धाचा मोठा परिणाम हा जागतिक बाजारपेठेवर झाला आहे. युद्धामुळे कच्च्या तेलापासून ते खाद्यतेलापर्यंत सर्वच वस्तू महाग झाल्या आहेत. सोन्यासारख्या मौल्यवान धातुच्या किमती देखील वाढल्या आहोत. दरम्यान येत्या काळात त्यामध्ये आणखी वाढ होऊ शकते असा अंदाज आहे. त्यामुळे सध्या सोन्यातील गुंतवणूक वाढताना दिसत आहे. सोन्याची मागणी वाढल्याने सोन्याच्या दरात तेजी आल्याचे पहायला मिळत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -