Friday, November 8, 2024
Homeकोल्हापूरनिपाणीत चोरट्यांचे डेरिंग वाढले; पोलीस अधिकाऱ्यासह माजी सैनिकाचे घर फोडले

निपाणीत चोरट्यांचे डेरिंग वाढले; पोलीस अधिकाऱ्यासह माजी सैनिकाचे घर फोडले

निपाणी शहर उपनगर व परिसरात गेल्या तीन महिन्यापासून घरफोड्यांचे सत्र सुरूच आहे. गुरुवारी चोरट्यांनी सेवानिवृत्त पोलीस अधिकारी यांचे घर फोडून रक्कम व ऐवज लांबवला. याशिवाय अन्य दोन ठिकाणी घरफोडी झाली असून यामध्ये माजी सैनिकाच्या घराचाही समावेश आहे. गेल्या तीन महिन्यात निपाणी शहर व उपनगरात 40 घरफोड्या झाल्या आहेत. नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. यावर पोलिस प्रशासनाने योग्य त्या उपाययोजना करून वेळीच चोरट्यांना जेरबंद करावे, अशी मागणी हाेत आहे.

शहराच्या मध्यवर्ती भागातील शिवाजीनगर पहिली गल्लीतील चव्हाण अपार्टमेंटमध्ये चोरट्यांनी दोन बंद घरे फोडली. चांदी व रोकड असा एकूण २० हजाराचा ऐवज लांबविला. त्यामुळे परिसरातील नागरिकात घबराट पसरली आहे. जवान विक्रम सदाशिव चव्हाण व निवृत्त सहाय्यक फौजदार एम. एस. हांजी यांच्या घरात चोरी झाली.

याबाबतची अधिक माहिती अशी की, विक्रम चव्हाण हे सैनिक आहेत. त्यांच्या घरची मंडळी बाहेरगावी गेली होती. माजी सहाय्यक फौजदार एम. एस. हंजी हे देखील बाहेरगावी गेले होते. चोरट्यांनी दुसऱ्या मजल्यावरील दोन घरे फोडली. एम. एस. हंजी यांच्या घरातील दोन पैंजणजोड व ६ हजाराची रकम तर विक्रम चव्हाण यांच्या घरातील 1600 रुपयांसह एकूण २० हजारांचा ऐवज चोरट्यांनी लांबविला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -