Monday, December 23, 2024
Homeमहाराष्ट्रधक्कादायक! घरात घुसून दोन वयोवृद्ध महिलांवर बलात्कार, 22 वर्षांच्या तरुणाला अटक

धक्कादायक! घरात घुसून दोन वयोवृद्ध महिलांवर बलात्कार, 22 वर्षांच्या तरुणाला अटक

महिलांवरील अत्याचार बलात्काराच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. अशामध्ये शहापूर तालुक्यातील वाशिंद येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. एका तरुणाने घरात घुसून दोन वयोवृद्ध महिलांवर बलात्कार केला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. या घटनेप्रकरणी वाशिंद पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शहापूर तालुक्यातील वाशिंद येथे 20 मार्चला ही घटना घडली आहे. वाशइंद पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये राहणाऱ्या दोन वयोवृद्ध महिलांवर आरोपीने बलात्कार केला आहे. भूषण हिंदोळे (22 वर्षे) असे आरोपीचे नाव आहे. आरोपीने 70 वर्षीय आणि 72 वर्षीय महिलांवर बलात्कार केला आहे. वयोवृद्ध महिलेला घरामध्ये एकटे पाहून आरोपी भूषण तिच्या घरात घुसला. त्याने या महिलेला जीवे मारण्याची धमकी देत तिच्यावर बलात्कार केला. या घटनेमुळे घाबरलेल्या महिलेने कोणालाच याबद्दल काही सांगितले नाही.

त्यानंतर आरोपीने याचाच फायदा घेत दुसऱ्या दिवशी म्हणजेच 21 मार्चला शेजारी राहणाऱ्या आणखी एका 72 वर्षीय महिलेवर बलात्कार केला. ही महिला घरामध्ये एटकी असल्याचे पाहून तो तिच्या घरात घुसला आणि तिला सुद्धा जीवे मारण्याची धमकी देत तिच्यावर बलात्कार केला. दोन दिवस लागोपाठ घडलेल्या या बलात्काराच्या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. त्यानंतर 23 मार्चला या दोन्ही महिलांनी न घाबरता थेट पोलिस ठाण्यात धाव घेतली. त्यांनी घडलेला सर्व प्रकार पोलिसांना सांगितला. पोलिसांनी महिलांच्या तक्रारीवरुन आरोपीविरोधात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आणि आरोपीचा शोध सुरु केला. पोलिसांनी 25 मार्च रोजी वाशिंद पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातून आरोपी भूषण हिंदोळेला अटक केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -