Homeमहाराष्ट्रसाताऱ्यात अवघ्या 19 वर्षाच्या लेकीला बापानं आणि चुलत्यानं तोंड आणि नाक दाबून...

साताऱ्यात अवघ्या 19 वर्षाच्या लेकीला बापानं आणि चुलत्यानं तोंड आणि नाक दाबून संपवलं; म्हणे, मुलीच्या वागण्यामुळे कुटुंबाची आणि समाजातील प्रतिष्ठा धोक्यात आली

साताऱ्यात कौटुंबिक वादातून 19 वर्षीय तरुणीचा नाक आणि तोंड दाबून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मुलीच्या वागण्यामुळे कुटुंबाची आणि समाजातील प्रतिष्ठा धोक्यात येत असल्याच्या कारणातून वडील आणि चुलत्याने तिचा जीव घेतल्याचा आरोप आहे. या प्रकरणात पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं आहे. दोघांनी मिळून हर्षदाचे तोंड आणि नाक दाबल्याने तिचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. या याप्रकरणी मुलीचे वडील आणि चुलते या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले असून न्यायालयात हजर केले असता त्यांना तीन दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

 

मात्र, तिच्या वागण्यावरून घरात वारंवार वाद होत होते. हर्षदा पुण्यात शिक्षण घेत होती. ती रोज सकाळी आठ वाजता घराबाहेर पडून रात्री आठ वाजता घरी येत होती. तिच्या या दिनक्रमावरून वडील आणि मुलीमध्ये अनेकदा वाद होत होते. वडिलांनी पैसे देण्यास नकार दिल्यास ती घरातून बाहेर जाण्याची धमकी देत होती, अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे सततच्या वादातून हर्षदाच्या वडिलांनी आणि चुलत्याने तिचे वागणे कायमचे थांबवण्याचा निर्णय घेतल्याचा आरोप आहे.

 

हर्षदाच्या वागण्याबाबत कुटुंबात मतभेद असले तरी तिच्यावर अशा प्रकारे टोकाचे पाऊल उचलल्याने या घटनेची साताऱ्यात गंभीर चर्चा सुरू झाली आहे. घरातील वाद, मुलीच्या स्वातंत्र्याबाबतचे मतभेद आणि कुटुंबाची सामाजिक प्रतिष्ठा यामुळे हा प्रकार घडल्याचा आरोप करण्यात आला आहे. मुलीच्या वागण्यावरून सुरू झालेला कौटुंबिक वाद अखेर तिच्या मृत्यूपर्यंत पोहोचला असल्याने या प्रकरणाचा तपास सुरू आहे. या खून प्रकरणात फक्त एवढीच कारणे आहेत की अजून काही वेगळी कारणे आहेत हे पुढे तपासानंतर स्पष्ट होणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -