Tuesday, February 24, 2026
Homeक्रीडाचेन्नईची पराभवाची हॅट्ट्रिक, पंजाबचा 54 धावांनी मोठा विजय

चेन्नईची पराभवाची हॅट्ट्रिक, पंजाबचा 54 धावांनी मोठा विजय

ताजी बातमी ऑनलाईन टीम
मुंबई: आयपीएल 2022 मध्ये चेन्नई सुपर किंग्स (CSK) खूप खराब कामगिरी करत आहे. मागच्या 12 सीजनपेक्षाही वाईट कामगिरी चेन्नई या सीजनमध्ये करतेय. आज पंजाब किंग्स विरुद्धच्या सामन्यात चेन्नईने पराभवाची हॅट्ट्रिक केली. सलामीच्या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्स (KKR) त्यानंतर लखनौ सुपर जायंट्स (LSG) आणि आज पंजाब किंग्सने CSK चा पराभव केला.


मागच्या सामन्याच्या तुलनेत चेन्नई सुपर किंग्सच्या गोलंदाजीत सुधारणा दिसली. पण फलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात निराशाजनक प्रदर्शन कायम होतं. अंबाती रायुडूने आजचा स्टार लियाम लिविंगस्टोनचा एक सोपा झेल सोडला. चेन्नईने नाणेफेक जिंकून पंजाबला प्रथम फलंदाजीला निमंत्रित केलं. पंजाबने प्रथम फलंदाजी करताना 180 धावा केल्या. या लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नई सुपर किंग्सचा डाव अवघ्या 126 धावात आटोपला. पंजाबने 54 धावांनी मोठ्या विजयाची नोंद केली. चेन्नईकडून फक्त शिवन दुबेने सर्वाधिक (57) धावांची खेळी केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -