Homeक्रीडा'या' 2 स्टार खेळाडूंच्या बदल्यात हार्दिक पांड्या KKR मध्ये जाणार! मुंबई इंडियन्स...

‘या’ 2 स्टार खेळाडूंच्या बदल्यात हार्दिक पांड्या KKR मध्ये जाणार! मुंबई इंडियन्स मोठ्या डीलच्या तयारीत

आयपीएल 2027 च्या पूर्वी मुंबई इंडियन्सचा कर्णधार राहिलेला हार्दिक पांड्या हा ट्रेड होऊन दुसऱ्या संघात जाणार अशी चर्चा मागचा सीजन संपल्यापासून सुरु होती. आता पुन्हा एकदा ऑक्शन जवळ आल्यावर हार्दिकची कोलकाता नाईट रायडर्समध्ये जाण्याची चर्चा होऊ लागली आहे.

 

रिपोर्ट्सच्या सांगण्यानुसार मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला रिलीज करण्याच्या बदल्यात एक केकेआरकडून त्यांच्या दोन स्टार खेळाडूंची मागणी केली आहे. हे दोन खेळाडू म्हणजे स्टार फलंदाज अंगकृष रघुवंशी आणि वेगवान गोलंदाज हर्षित राणा हे आहेत. तर दुसरीकडे कोलकाता नाईट रायडर्सला नव्या कर्णधाराचा शोध आहे. या भूमिकेत हार्दिक एक मजबूत पर्याय म्हणून समोर आला आहे. मुंबई आणि केकेआर यांच्यातील हा व्यवहार जवळपास निश्चित झाला असल्याची माहिती आहे. केवळ अंगकृश रघुवंशीच्या बाबतीत अडचण आहे. जर केकेआर त्याला सोडायला तयार झाले, तर हार्दिकच्या केकेआरमध्ये सामील होण्याचा मार्ग मोकळा होईल.

 

मुंबईने अंगकृष आणि हर्षितला मागितलं :

 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, ‘मुंबई इंडियन्स हार्दिक पांड्याच्या बदल्यात हर्षित राणा आणि अंगकृष रघुवंशी या दोघांना आपल्या संघात घेऊ इच्छिते. मुंबईला भारतोयय विकेटकिपर फलंदाजांची गरज आहे. जी कमतरता अंगकृष दूर करू शकेल. हा युवा फलंदाज देशांतर्गत क्रिकेटमध्ये सुद्धा चांगलं प्रदर्शन करतोय. त्याला भविष्यातील स्टार खेळाडू म्हणून पाहिलं जातं आहे.

 

केकेआरसाठी महत्वाचे दोन खेळाडू :

 

हर्षित राणा हा केकेआरसाठी एक महत्त्वाचा वेगवान गोलंदाज राहिला आहे. 2024 मध्ये फ्रँचायझीला विजेतेपद मिळवून देण्यात त्याने मोलाची भूमिका बजावली होती. अशा परिस्थितीत या खेळाडूंपैकी कोणालाही संघातून मुक्त करणे कोलकातासाठी सोपा निर्णय नसेल. विशेषतः अंगकृशच्या बाबतीत संघ द्विधा मनस्थितीत आहे. कारण आगामी हंगामात तो केकेआरच्या फलंदाजी फळीसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरू शकतो.

 

कर्णधारपदासाठी हार्दिकची केकेआरवर नजर :

 

अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीनंतर केकेआर नवीन कर्णधाराच्या शोधात आहे. हार्दिक पांड्या या जबाबदारीसाठी अगदी योग्य पर्याय आहे. त्याच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्सने 2022 मध्ये आपल्या पहिल्याच सीजनमध्ये आयपीएलचे विजेतेपद पटकावले होते. मात्र मुंबई इंडियन्ससोबतचा त्याचे मागील तीन सीजन चांगले राहिले नाहीत. मुंबईसोबतचा हा करार पूर्ण झाला तर हार्दिककडे केकेआरचे कर्णधारपद सोपवले जाऊ शकते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -