Saturday, February 21, 2026
Homeब्रेकिंगमुलींना मोबाइल का दाखवतो, याचा जाब विचारल्याने केला खून

मुलींना मोबाइल का दाखवतो, याचा जाब विचारल्याने केला खून


मुलींना मोबाइल का दाखवतो, याचा जाब विचारल्याच्या रागातून एकाचा चाकूने भोसकून खून केल्याची घटना घडली. त्र्यंबक रोडवरील उत्कर्षनगर येथे ही घटना घडली असून, रमेश नारायण ताठे असे खून झालेल्याचे नाव आहे. या घटनेत संशयित जखमी झाला असून, उपचारासाठी त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्कर्षनगर येथे बुधवारी (दि. 13) रात्री संशयित गौरव सुहास जाधव याचा भाऊ अजिंक्य हा ताठे यांच्या मुलींना मोबाइल दाखवित होता. त्यावेळी ताठे यांनी, माझ्या मुलींना मोबाइल का दाखवितो, याचा जाब अजिंक्यला विचारला. तसेच इथून निघून जा, असेही ताठे यांनी त्याला बजावले. अजिंक्यला जाब विचारल्याचा राग संशयित गौरवने मनात ठेवला. दरम्यान, गुरुवारी (दि. 14) रात्री दीड ते पावणेदोनच्या सुमारास संशयित गौरवने उत्कर्षनगर मित्रमंडळाच्या स्टेजजवळ ताठे यांच्यावर धारदार चाकूने वार केले. त्यात ताठे गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. यावेळी संशयित गौरवही जखमी झाल्याने पोलिसांनी त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.

मनीष काशीनाथ रूपवते यांच्या फिर्यादीनुसार, गंगापूर पोलिसांत संशयित गौरव जाधवच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला असून, वरिष्ठ पोलिस निरीक्षक रियाज शेख यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -