ताजी बातमी ऑनलाईन टीम
मुंबई : आमदार मंगेश कुडाळकर यांच्या पत्नीने केली राहत्या घरी आत्महत्या
शिवसेनेचे कुर्ला विधानसभेचे आमदार मंगेश कुडाळकर यांच्या पती रजनी कुडाळकर (वय ४२) यांनी राहत्या घरी आत्महत्या केली. ही घटना रविवार (दि १७) रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेमूळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.
रविवारी रात्री ९.१५ च्या दरम्यान त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती मिळाली आहे. नेहरू नगर येथील त्यांच्या घरी पोलीस दाखल झाले असून ही आत्महत्या त्यांनी का केली? कशी केली ? याचा तपास सध्या सुरू आहे. काही दिवसांपूर्वी मंगेश कुडाळकर यांच्या मुलाचा अपघाती मृत्यू झाला होता. त्यात आता त्यांच्या पत्नीनेही आत्महत्या केल्याने कुडाळकर कुटुंबावर सलग दुस-यांदा दुःखाचे डोंगर कोसळला आहे. त्यामूळे हळहळ व्यक्त केली जात आहे.