Monday, December 23, 2024
Homeब्रेकिंगएसटीचे 61 हजार कर्मचारी झाले रूजू

एसटीचे 61 हजार कर्मचारी झाले रूजू

सहा महिन्यांपासून ठप्प झालेल्या एसटीची वाहतूक आता पूर्वपदावर येत आहे. सोमवारी 18 एप्रिलपर्यंत 61 हजार 647 कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत. महामंडळाच्या हजेरीपटावर सध्या एकूण 82,108 कर्मचारी आहेत. सोमवारी एका दिवसात हजर झालेल्या कर्मचार्यांरची संख्या 15 हजार 185 इतकी होती. त्यामुळे महामंडळाने संध्याकाळपर्यंत राज्यात 18 हजार 512 फेर्याज चालविल्या.

संपकरी कर्मचाऱ्याना 22 एप्रिलपर्यंत हजर होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या काळात हजर होणार्या0 कर्मचार्यामवर कोणतीही कारवाई करण्यात येणार नसल्याने कर्मचारी मोठ्या संख्येने हजर होत आहेत. महामंडळाने बडतर्फ केलेल्या अकरा हजारांपेक्षा जास्त कर्मचार्यांमना कामावर रुजू होण्याची संधी दिली आहे. त्यामुळे कर्मचारी कामावर येत आहेत. सोमवार संध्याकाळपर्यंत 20 हजार 303 चालक आणि 16 हजार 703 वाहक कामावर हजर झाले.

कार्यशाळा आणि प्रशासकीय मिळून एकूण 27 हजार 797 कर्मचारी कामावर हजर झाले आहेत. संपकाळात राज्यातील 250 आगारांमधील वाहतूक तुरळक प्रमाणात सुरू होती. सोमवारी राज्यातील विविध मार्गांवर 18 हजार 512 फेर्या  धावल्या. या फेर्यांरतून सुमारे 18 लाख प्रवाशांनी प्रवास केला,तर महामंडळाला सुमारे 13 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले.

मुंबई विभागाची स्थिती
सोमवारी मुंबई विभागात 148 चालक, 152 वाहक,चालक कम वाहक 106 आणि कार्यशाळा कर्मचारी 50 असे एकूण 456 कर्मचारी कामावर हजर झाले. 8 ते 18 एप्रिलदरम्यान मुंबई विभागात संध्याकाळी सहावाजेपर्यंत 569 कर्मचारी कामावर आले आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -