ताजी बातमी ऑनलाईन टीम
ओला इलेक्ट्रिक (Ola Electric) कंपनीने मोठा निर्णय घेतला आहे. ओलाने आपल्या 1,441 ईस्कूटर्स (E-scooters) बाजारातून वापस मागवल्या आहेत. मिळत असलेल्या माहितीनुसार ओलाच्या ईस्कूटर्सला वारंवार आग (Fire) लागण्याच्या घटना घडत आहेत. या पार्श्वभूमीवर कंपनीने आपल्या स्कूटर्स वापस बोलवण्याचा निर्णय घेतला आहे.
ओला इलेक्ट्रिक (Ola Electric) कंपनीने मोठा निर्णय घेतला आहे. ओलाने आपल्या 1,441 ईस्कूटर्स (E-Scooters) बाजारातून वापस मागवल्या आहेत. मिळत असलेल्या माहितीनुसार ओलाच्या ईस्कूटर्सला वारंवार आग (Fire) लागण्याच्या घटना घडत आहेत. या पार्श्वभूमीवर कंपनीने आपल्या स्कूटर्स वापस बोलवण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत बोलताना कंपनीच्या वतीने सांगण्यात आले की, पुण्यात 26 मार्च रोजी ओला ई- स्कूटर्सला आग लागली होती. या घटनेची चौकशी सुरू आहे. प्राथमीक चैकशीमध्ये असे आढळून आले आहे की, इतर स्कूटरला ज्या पद्धतीने आग लागली होती, त्या प्रकारची ही घटना नसून, ही एक वेगळी घटना आहे. भविष्यात पुन्हा अशा घटना घडू नयेत यासाठी कंपनीकडून पुन्हा एकदा ई-स्कूटरची तपासणी करण्यात येणार आहे. आमचे अभियंते या स्कूटरची पुन्हा चाचणी घेणार आहेत. त्यामुळे कंपनीने आपल्या ई-स्कूटर्स पुन्हा मागे बोलवण्याचा निर्णय घेतला आहे.