Thursday, March 19, 2026
Homeकोल्हापूरकोल्हापूर : येथील युवकाचा शॉक लागून मृत्यू

कोल्हापूर : येथील युवकाचा शॉक लागून मृत्यू

ताजी बातमी ऑनलाईन टीम

सिरसंगी येथील युवकाचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना घडली. प्रशांत प्रकाश कानडे (वय २२) असे शॉक लागून मृत्यू त्या दुर्दैवी युवकचे नाव आहे. काल वळीव पाऊस पडल्यानंतर सायंकाळी ६.३० वाजता सुतारकी नावाच्या शेतात गोठ्यातील जनावरांना पाणी पाजण्यासाठी गेला असता मोटर सुरू करत असताना विद्युत स्पर्श होऊन जागीच कोसळला.



मुलगा अजून का आला नाही म्हणून वडील प्रकाश कानडे हे शेतात गेले असता त्यांना मुलगा खाली पडल्याचे निदर्शनास आले. त्यांनी लागलीच ग्रामस्थांना बोलवून उपचारासाठी नेसरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले.पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. अत्यंत साधा व मनमिळावू स्वभावाच्या प्रशांतच्या जाण्याने सीरसंगी गावावर शोककळा पसरली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -