Sunday, July 27, 2025
Homeमनोरंजनउर्मिला कोठारे विनामेकअप कशी दिसते? १२ वर्षांनंतर छोट्या पडद्यावर कमबॅक

उर्मिला कोठारे विनामेकअप कशी दिसते? १२ वर्षांनंतर छोट्या पडद्यावर कमबॅक

अनेक अभिनेत्रींना पाहून आपणही त्यांच्यासारखं दिसावं, असं प्रत्येकीला वाटत असतं. अनेक अभिनेत्री आपलं सौंदर्य अबाधित ठेवण्यासाठी आणि फिटनेससाठी खूप मेहनत घेतात. यामध्ये मराठी अभिनेत्रीदेखील मागे नाहीत. आता मराठमोळी अभिनेत्री उर्मिला कोठारे हिच्या सौंदर्याची चर्चा होतेय. कारण आहे ‘तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेचे. १२ वर्षांनंतर उर्मिला कोठारे छोट्या पडद्यावर कमबॅक करत आहे. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे.

उर्मिला याआधी आपण ग्लॅमरस रुपात पाहिलं आहे. मात्र या मालिकेत ती नो मेकअप लूकमध्ये दिसणार आहे. अत्यंत हालाखीच्या परिस्थितीत आपल्या मुलीच्या भवितव्यासाठी झगडणारी आईची भूमिका उर्मिला या मालिकेत साकारते आहे. त्यामुळेच साधी साडी आणि वेणी अश्या नॉन ग्लॅमरस रुपात उर्मिला प्रेक्षकांच्याा भेटीला येईल. रणरणत्या उन्हात शूट करताना तिची कसोटी लागतेय. भूमिकेला पुरेपुर न्याय देण्यासाठी उर्मिलाने कंबर कसली आहे. गाण्याचं स्वप्न उराशी बाळगलेल्या आणि अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत ते पूर्ण करण्यासाठी झटणाऱ्या चिमुकल्या स्वराची गोष्ट मालिकेत आहे.

तुझेच मी गीत गात आहे या मालिकेसाठी रिअल लोकेशनचा वापर करण्यात येतोय. उर्मिला कोठारे विनामेकअप कशी दिसते? १२ वर्षांनंतर छोट्या पडद्यावर कमबॅक

अनेक अभिनेत्रींना पाहून आपणही त्यांच्यासारखं दिसावं, असं प्रत्येकीला वाटत असतं. अनेक अभिनेत्री आपलं सौंदर्य अबाधित ठेवण्यासाठी आणि फिटनेससाठी खूप मेहनत घेतात. यामध्ये मराठी अभिनेत्रीदेखील मागे नाहीत. आता मराठमोळी अभिनेत्री उर्मिला कोठारे हिच्या सौंदर्याची चर्चा होतेय. कारण आहे ‘तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेचे. १२ वर्षांनंतर उर्मिला कोठारे छोट्या पडद्यावर कमबॅक करत आहे. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे.

उर्मिला याआधी आपण ग्लॅमरस रुपात पाहिलं आहे. मात्र या मालिकेत ती नो मेकअप लूकमध्ये दिसणार आहे. अत्यंत हालाखीच्या परिस्थितीत आपल्या मुलीच्या भवितव्यासाठी झगडणारी आईची भूमिका उर्मिला या मालिकेत साकारते आहे. त्यामुळेच साधी साडी आणि वेणी अश्या नॉन ग्लॅमरस रुपात उर्मिला प्रेक्षकांच्याा भेटीला येईल. रणरणत्या उन्हात शूट करताना तिची कसोटी लागतेय. भूमिकेला पुरेपुर न्याय देण्यासाठी उर्मिलाने कंबर कसली आहे. गाण्याचं स्वप्न उराशी बाळगलेल्या आणि अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत ते पूर्ण करण्यासाठी झटणाऱ्या चिमुकल्या स्वराची गोष्ट मालिकेत आहे.
तुझेच मी गीत गात आहे या मालिकेसाठी रिअल लोकेशनचा वापर करण्यात येतोय. या मालिकेचं कथानक नागपूरमधील एका गावात घडतं. त्यामुळे शूटसाठी खऱ्या गावाची निवड करण्यात आलीय. मालिकेत दिसणारी घरं, आजूबाजूचा परिसर आणि विशेष म्हणजे गावकरी हे सगळं खरंखुरं आहे.

दुनियादारीतील भूमिकेसाठी उर्मिलाला ओळखलं जातं. शुभ मंगल सावधान, ती सध्या काय करते तसेच हिंदी टीव्ही मालिका मायका आणि मेरा ससुराल त्याचसोबत मराठी मालिका असंभव, गोष्ट एका लग्नाचीमध्ये तिने अभिनय केला आहे. ती एक शास्त्रीय नृत्यांगना आहे. तिने २०१४ मध्ये वेलकम ओबामामधून तिने तेलुगु सिनेमातही काम केले आहे. यामध्ये तिने यशोदा नावाची भूमिका साकारली होती.या मालिकेचं कथानक नागपूरमधील एका गावात घडतं. त्यामुळे शूटसाठी खऱ्या गावाची निवड करण्यात आलीय. मालिकेत दिसणारी घरं, आजूबाजूचा परिसर आणि विशेष म्हणजे गावकरी हे सगळं खरंखुरं आहे.

दुनियादारीतील भूमिकेसाठी उर्मिलाला ओळखलं जातं. शुभ मंगल सावधान, ती सध्या काय करते तसेच हिंदी टीव्ही मालिका मायका आणि मेरा ससुराल त्याचसोबत मराठी मालिका असंभव, गोष्ट एका लग्नाचीमध्ये तिने अभिनय केला आहे. ती एक शास्त्रीय नृत्यांगना आहे. तिने २०१४ मध्ये वेलकम ओबामामधून तिने तेलुगु सिनेमातही काम केले आहे. यामध्ये तिने यशोदा नावाची भूमिका साकारली होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -