Monday, July 28, 2025
Homeकोल्हापूरकोल्हापूर : 34 लाखांची रोकड ट्रान्स्पोर्ट कार्यालयातून लंपास

कोल्हापूर : 34 लाखांची रोकड ट्रान्स्पोर्ट कार्यालयातून लंपास

स्टेशन रोडवरील ट्रान्स्पोर्ट कंपनीच्या कार्यालयातून 34 लाख 50 हजारांची रोकड चोरट्याने लंपास केली. कार्यालयातील तिजोरीच्या लॉकरमध्ये ही रक्कम होती. 31 जानेवारी ते 25 एप्रिल या कालावधीत बनावट चावीचा वापर करून हा प्रकार केल्याची फिर्याद विजय बजरंग मुगडे (वय 25, रा. फुलेवाडी रिंगरोड) यांनी शाहूपुरी पोलिसांत दिली.

25 एप्रिलला पैशाची आवश्यकता असल्याने ट्रान्स्पोर्ट मालकांनी लॉकर उघडले. यावेळी येथे ठेवलेली रक्कम आढळली नाही. ही रक्कम नेमकी कोणत्?या दिवशी गेली हे त्यांनाही समजलेले नाही. लॉकरची कोणतीही मोडतोड झाली नसल्याने बनावट चावीचा वापर करून रक्कम चोरल्याचा संशय पोलिसांना आहे. शाहूपुरी पोलिस अधिक तपास करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -