Tuesday, July 29, 2025
Homeकोल्हापूरकोल्हापूर : गडहिंग्लजमध्ये पहाटेची अजान भोंग्यावरून न करण्याचा मुस्लीम समाजाचा निर्णय !

कोल्हापूर : गडहिंग्लजमध्ये पहाटेची अजान भोंग्यावरून न करण्याचा मुस्लीम समाजाचा निर्णय !

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मशिदीवरील भोंगे काढण्याच्या इशाऱ्यावरून राज्यभरातील वातावरण तापले असताना गडहिंग्लजमधील मुस्लीम समाजाने सकाळी होणारी अजान भोंग्यावरून न करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचे पत्र प्रांताधिकारी कार्यालयासह पोलीस ठाण्यालाही सुन्नी जुम्मा मशिदीच्या वतीने अधिकृतरित्या देण्यात आले आहे.

या पत्रामध्ये म्हटले आहे की, सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार रात्री १० ते सकाळी ६ वाजेपर्यत लाऊडस्पिकर वापरण्यास मनाई आहे. या आदेशाचे पालन करत अन्य लोकांना कोणाताही त्रास होवू नये, यासाठी पहाटेची अजान बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. शहरातील सुन्नी जुम्मा मशिद, मोहम्मदीया अरबी मदरसा आणि मदीना मशिद या तिन्ही ठिकाणी याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे.

याशिवाय सर्वच धर्मियांच्या प्रार्थनास्थळावर आवाजाचे नियंत्रण ठेवणारे मशिन्स उपलब्ध करून दयावेत. जेणेकरून कोणालाही त्याचा त्रास होणार नाही. गडहिंग्लज हे सामाजिक सलोखा ठेवणारे शहर असून शहराच्या संस्कृतीला साजेसा हा निर्णय घेतला आहे. दरम्यान, याबाबत कोल्हापूर जिल्ह्यात सर्वप्रथम गडहिंग्लजमध्ये निर्णय घेऊन मुस्लीम समाजाने वेगळा आदर्श निर्माण केला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -