Sunday, July 27, 2025
Homeसांगलीराष्ट्रवादी तर्फ़े मनसेच्या राज ठाकरे यांच्यावर रासुका अंतर्गत कारवाई करण्याची मागणी

राष्ट्रवादी तर्फ़े मनसेच्या राज ठाकरे यांच्यावर रासुका अंतर्गत कारवाई करण्याची मागणी

मिरज/ प्रतिनिधी
आज मिरज प्रांत कार्यालया समोर राष्ट्रवादी विधानसभा क्षेत्र अध्यक्ष प्रमोद इनामदार यांच्या नेतृत्वाखाली मनसेचे राज ठाकरे यांच्या विरोधात निदर्शन करण्यात आले राज ठाकरे यांच्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायदा व राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे या मागणीचे निवेदन प्रांत कार्यालय येथे देण्यात आले औरंगाबाद येथे राज ठाकरे यांनी सभा करून हिंदू मुस्लिम धर्मा मध्ये विद्वेष निर्माण करण्याचा व विभाजन वादी विचार त्यांनी मांडले, राज ठाकरे हे ब्राह्मण वादी विचारांचे असल्याचा आरोप प्रमोद इनामदार यांनी केला

भोंग्यावरून अजान दिल्यास मशीदसमोर हनुमान चालीसा लावू असे म्हणून कायदा हातात घेण्यासारखे आणि हिंदू मुस्लिम तेढ निर्माण करण्यासारखे असल्याने राज ठाकरे यांच्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायदा व राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली यावेळी गंगाधर तोडकर जावेद मनेर जैलब शेख राहुल इनामदार दिनकर काकडे गोलंदाज बिरु शिंगाडे हे उपस्थित होते

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -