चित्रपट नि वादाचं नातं तसं जूनं.. आतापर्यंत अनेकदा चित्रपटांवर आक्षेप घेण्यात आले.. कधी चित्रपटांतील दृश्यावर, कधी कथेवर तर कधी सामाजिक भावना दुखावल्याच्या कारणावरुन चित्रपटांवर बंदीची मागणी करण्यात आली.. त्यातून काही चित्रपट थंड बस्त्यात गेले तर काही वादातून सावरुन प्रदर्शितही झाले.
अशाच एका वादात आता अभिनेता रणवीर सिंह अडकला आहे.. लवकरच त्याचा ‘जयेशभाई जोरदार’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यासाठी गेल्या काही दिवसांपासून रणवीर सिंह या सिनेमाचे नावाप्रमाणे अगदी ‘जोरदार’ प्रमोशन करीत आहे. मात्र, रिलीज होण्यापूर्वीच हा चित्रपट अडचणीत आलाय.
खरं तर हा चित्रपट याआधीच प्रदर्शित होणार होता. मात्र, कोरोनामुळे आतापर्यंत दोन वेळा चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलावी लागली.. आता 13 मे रोजी हा सिनेमा प्रदर्शित होत आहे. पण, त्याआधीच ‘जयेशभाई जोरदार’ सिनेमाच्या टीमला ‘दिल्ली हायकोर्टा’ची पायरी चढावी लागणार असल्याचे दिसते..
आक्षेप कशामुळे..?
‘युथ अगेन्स्ट क्राइम’ नावाच्या ‘एनजीओ’ने दिल्ली हायकोर्टात या सिनेमाविरोधात याचिका दाखल केलीय. मुख्य न्यायाधीश विपिन सांघी आणि न्यायमूर्ती नवीन चावला यांच्या खंडपीठासमोर त्याची सुनावणी होणार आहे..
अधिवक्ता पवन प्रकाश पाठक यांच्यामार्फत दाखल केलेल्या याचिकेत असं म्हटलंय, की “हा चित्रपट स्री-भ्रूणहत्येच्या विषयावर आधारित असून, ‘मुलगी वाचवा’ या मोहिमेवर भर दिला आहे. पण, चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये प्रसुतिपूर्व लिंग निदान स्क्रिनिंगचा एक सीन दाखवला आहे.
तसेच, चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये ‘अल्ट्रा साऊंड’ तंत्रज्ञानाच्या वापराची जाहिरात केली आहे, जी योग्य नाही. गर्भधारणा व प्रसवपूर्व निदान तंत्र कायदा, 1994 अंतर्गत ही बाब बेकायदेशीर आहे. या कायद्यानुसार ‘प्री-नॅटल लिंग स्क्रीनिंग’ला बंदी आहे. त्यामुळे चित्रपटातून हे दृश्य वगळण्याची मागणी याचिकेत करण्यात आली आहे.
अधिवक्ता पवन प्रकाश पाठक यांच्यामार्फत दाखल केलेल्या याचिकेत असं म्हटलंय, की “हा चित्रपट स्री-भ्रूणहत्येच्या विषयावर आधारित असून, ‘मुलगी वाचवा’ या मोहिमेवर भर दिला आहे. पण, चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये प्रसुतिपूर्व लिंग निदान स्क्रिनिंगचा एक सीन दाखवला आहे.