Monday, July 7, 2025
Homeकोल्हापूरकोल्हापूर : शहरातील ए, बी वॉर्डास आज अपुरा पाणीपुरवठा

कोल्हापूर : शहरातील ए, बी वॉर्डास आज अपुरा पाणीपुरवठा

ताजी बातमी ऑनलाईन टीम

बालिंगा शुद्ध जल उपसा केंद्रातील व्हर्टिकल टर्बाईन पंप मोटर गुरुवारी सायंकाळी नादुरुस्त झाली असून तिचे काम तत्काळ हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे बालिंगा उपसा केंद्रावर अवलंबून असणार्‍या भागांना शुक्रवारी (दि. 6) अपुरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.



ए, बी वॉर्ड त्यास संलग्नित उपनगरे, ग्रामीण भाग व शहरातील लक्षतीर्थ वसाहत परिसर, संपूर्ण फुलेवाडी व फुलेवाडी रिंगरोड परिसर, सानेगुरुजी परिसर, क्रशर चौक परिसर, आपटेनगर टाकी परिसर, राजोपाध्येनगर परिसर, कणेरकरनगर परिसर, क्रांतिसिंह नाना पाटीलनगर परिसर, तुळजाभवानी कॉलनी परिसर, देवकर पाणंद परिसर, टेंभे रोड परिसर, शिवाजी पेठ परिसर, चंद्रेश्वरगल्ली परिसर, तटाकडील तालीम परिसर, साकोली कॉर्नर परिसर, उभा मारुती चौक परिसर, बिनखांबी गणेश मंदिर परिसर, महालक्ष्मी मंदिर परिसर, मिरजकर तिकटी परिसर, महाद्वार रोड परिसर, मंगळवार पेठ या भागात शुक्रवारी होणारा दैनंदिन पाणीपुरवठा अपुरा व कमी दाबाने होईल.



त्याचबरोबर सी व डी वॉर्डातील दुधाळी परिसर, गंगावेश परिसर, उत्तरेश्वर पेठ परिसर, शुक्रवार पेठ परिसर, ब—ह्मपुरी परिसर, बुधवार पेठ तालीम परिसर, सिद्धार्थनगर परिसर, दसरा चौक परिसर, पापाची तिकटी परिसर, लक्ष्मीपुरी परिसर, शनिवार पेठ चौक परिसर, सोमवार पेठ परिसर, ट्रेझरी ऑफिस परिसर, बिंदू चौक परिसर, कॉमर्स कॉलेज परिसर, आझाद चौक परिसर, रविवार पेठ परिसर, उमा टॉकीज परिसर, गुजरी परिसर, देवल क्लब परिसरात व ई वॉर्डातील खानविलकर पेट्रोल पंप परिसर, शाहूपुरी 5, 6, 7 व 8 वी गल्ली, कुंभार गल्ली व बागल चौक आदी भागात शुक्रवारी पाणीपुरवठा अपुरा व कमी दाबाने
होईल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -