Sunday, July 6, 2025
Homeमहाराष्ट्रमहाराष्ट्रात मान्सून इतके दिवस ‘आधी’ येणार

महाराष्ट्रात मान्सून इतके दिवस ‘आधी’ येणार

यंदा विक्रमी उष्म्याने हैराण केले असतानाच मान्सूनची ‘गूड न्यूज’ मिळाली आहे. महाराष्ट्रासह देशासाठी ही आनंदाची बातमी आहे, कारण यंदा मान्सून चांगला होणार असल्याचा अंदाज स्कायमेटकडून वर्तवण्यात आला आहे. तसेच मान्सून 2022 ठरलेल्या वेळेपेक्षा 10 दिवस आधीच देशात दाखल होणार असल्याचे समजत आहे.

‘युरोपियन सेंटर फॉर मीडियम-रेंज वेदर पह्रकास्ट’ या संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, 20 किंवा 21 मे रोजी तो केरळच्या किनारपट्टीवर धडकेल. निर्धारित वेळेच्या जवळजवळ 10 दिवस आधी मान्सूनचे आगमन देशात होईल. तसेच पुढील काही दिवसांत देशाच्या उर्वरित भागांत मान्सूनची बरसात होईल. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, जून ते सप्टेंबर या कालावधीत सरासरी 880.6 मिमी पाऊस पडतो. त्या तुलनेत पावसाची 98 टक्के शक्यता आहे. या दरम्यान गुजरातमध्ये सामान्यपेक्षा कमी पाऊस पडेल, तर पंजाब, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, हरियाणा आणि महाराष्ट्रात जास्त पाऊस पडेल.

यंदा दहा दिवस आधीच मान्सूनची बरसात सुरू होणार आहे. मान्सून केरळमध्ये जूनच्या पहिल्या आठवडय़ात दाखल होतो. बंगालच्या उपसागरात झालेल्या हवामान बदलानुसार सध्या अरबी समुद्रात अँटी-सायक्लोन क्षेत्र तयार होत असल्याचे संकेत मिळतात. त्यामुळे मान्सून केरळमध्ये लवकर पोहोचू शकतो.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -