Sunday, July 6, 2025
Homeमहाराष्ट्रधक्कादायक : बिर्याणी कमी वाढल्याने केला मित्राचा खून, आरोपीला जन्मठेप

धक्कादायक : बिर्याणी कमी वाढल्याने केला मित्राचा खून, आरोपीला जन्मठेप

बिर्याणी कमी वाढल्याच्या किरकोळ कारणावरून मित्राचा खून करणार्‍या आरोपीला जन्मठेपेची शिक्षा व पाच हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. जिल्हा व अपर सत्र न्यायाधीश एस. बी. बहाळकर यांनी बुधवारी (दि. 4) हा निकाल घोषित केला.

कर्‍हे शिवारातील किल्ला सरा डोंगराच्या पायथ्याशी दि. 7 जानेवारी 2017 रोजी ही घटना घडली होती. निवृत्ती किसन विटेकर (35, रा. सिडको, नाशिक) याचा खून झाला होता. ते शंकर हिरामण डगळे (40, रा. पिंपळद, घोटी) याच्या समवेत हरिभाऊ मुरलीधर वाघ (रा. सडकसौंदाणे, मालेगाव) याच्या घराजवळ विद्युत पंप उचलून ट्रॅक्टर ट्रॉलीत ठेवत असताना, कांतिलाल धनाजी शेळके (45, रा. समर्थनगर, ता. गंगापूर) यांच्या कपाळाला लागले होते. त्याला निवृत्तीच कारणीभूत ठरल्याचा राग कांतिलालच्या मनात कायम होता.

ते पंप आणि विहिरीतील गाळ काढण्याची क्रेन घेऊन कर्‍हे शिवारातील योगेश मांडवडे यांच्या शेतात आले. या ठिकाणी रात्री जेवताना कांतिलालने, बिर्याणी कमी का वाढली, यावरून कुरापत काढली. त्याला, तूच सर्व खातो का, असे प्रत्युत्तर मिळाल्याने संतापात कांतिलालने लोखंडी फावड्याने निवृत्तीच्या डोक्यात, तोंडावर तसेच गुप्तांंगावर जबर मारहाण केली. त्यातच तो गतप्राण झाला. दुसर्‍या दिवशी 8 तारखेला सकाळी कांतिलाल आणि हरिभाऊ वाघने मृतदेह दरीत झाडाझुडूपात टाकून दिल्याचा आरोप होता. या प्रकरणी हवालदार हेमंत कदम यांच्या फिर्यादीवरून सटाणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. सहायक पोलिस निरीक्षक एन. ए. मगर यांनी गुन्ह्याचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकारी पक्षातर्फे अ‍ॅड. अशोक पगारे यांची आठ साक्षीदार तपासले. त्यांच्या युक्तिवादाने गुन्हा सिद्ध झाला. कांतिलाल शेळकेला जन्मठेप झाली, तर हरिभाऊला संशयाचा फायदा होऊन निर्दोष मुक्तता झाली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -