Saturday, July 5, 2025
Homeब्रेकिंगबहीण दयेची भीक मागत राहिली पण भावाने ऐकलं नाही, मेहुण्याची केली निर्घृण...

बहीण दयेची भीक मागत राहिली पण भावाने ऐकलं नाही, मेहुण्याची केली निर्घृण हत्या

हैदराबादमध्ये ऑनर किलिंगची घटना समोर आली आहे. मुस्लीम तरुणीने हिंदू तरुणाशी लग्न केल्यामुळे संतप्त झालेल्या तरुणीच्या भावाने मेहुण्याची निर्घृण हत्या केली आहे. तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये ही घटना घडली आहे. हैदराबादच्या सरुरनगरमधील चौकात तरुणाने आपल्या नातेवाईकांच्या मदतीने मेहुण्याची निर्घृण हत्या केली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 4 मे रोजी हैदराबादच्या सरूरनगरमध्ये नागराजू नावाच्या तरुणाची हत्या करण्यात आली. नागराजू आणि त्याची पत्नी सुलताना दुचाकीवरून जात असताना त्यांना सुलतानाच्या भावाने अडवले. यावेळी सुलतानाच्या भावाने रॉड आणि चाकूने सपासप वार करत नागराजूची भरचौकात हत्या केली. महत्वाची गोष्ट म्हणजे ही घटना ज्याठिकाणी घडली त्याठिकाणी मोठ्या संख्येने लोकं उपस्थित होते. पतीचा जीव वाचावा यासाठी सुलताना मारेकऱ्यांकडे आणि उपस्थित लोकांकडे दयेची भीक मागत होती पण एकही जण तिच्या मदतीला धावून आले नाही. सुलतानाच्या भावाने केलेल्या हल्ल्यात तिच्या पतीचा जागीच मृत्यू झाला.

नागराजू हा हैदराबादच्या रंगारेड्डी जिल्ह्यातील मारपल्ली गावचा रहिवासी होता. तर त्याची पत्नी सुलताना त्याच्या शेजारच्या घनापूर गावात राहत होती. दोघेही एकाच कॉलेजमध्ये शिकत होते. सुरुवातीला दोघे एकमेकांचे चांगेल मित्र होते. त्यानंतर मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. दोघे सात वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. पण सुलतानाचे कुटुंब नागराजूच्या विरोधात होते. सुलतानाचे नागराजूसोबत असलेले प्रेम त्यांना मान्य नव्हते. कारण नागराजू हा दुसऱ्या धर्माचा होता. पण ३१ जानेवारी रोजी नागराजू आणि सुलतानाने पळून जाऊन लग्न केले. त्यांनी लाल दरवाजा परिसरातील आर्य समाज मंदिरात लग्न केले आणि लग्नानंतर सुलतानाने तिचे नाव बदलून पल्लवी ठेवले. सुलताना आणि नागराजू यांच्या लग्नामुळे तिचे कुटुंबीय खूप नाराज होते.

या लग्नावरुन नाराज असलेल्या सुलतानाच्या भावाने आपल्या नातेवाईकांच्या मदतीने नागराजूची हत्या करण्याचा कट रचला आणि बुधवारी त्यांनी त्याच्यावर हल्ला करत त्याची हत्या केली. सुलतानाने सांगितले की, मारेकरी एक महिन्यापासून माझ्या पतीच्या मागे लागले होते 4 मे रोजी आरोपींनी नागराजूचा पाठलाग केला आणि सरूरनगरमधील रेड लाईट चौकात नागराजूला घेरले. माझ्या भावासह पाच जण तेथे आले आणि माझ्या पतीची हत्या केली. मारेकऱ्यांनी लोखंडी रॉड आणि चाकूने हल्ला केला. मी मदतीसाठी खूप विनंती केली पण कोणीच मदतीला आले नाही. माझ्या डोळ्यासमोरच त्यांनी माझ्या पतीची हत्या केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -