Sunday, December 22, 2024
Homeब्रेकिंगसावधान ! चिकन खाल्ल्याने तरुणीचा मृत्यू, जाणून घ्या काय आहे 'हे' प्रकरण

सावधान ! चिकन खाल्ल्याने तरुणीचा मृत्यू, जाणून घ्या काय आहे ‘हे’ प्रकरण

हॉटेलमध्ये चिकन खाल्ल्यानंतर एका तरुणीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना केरळमध्ये घडली. अन्नातून विषबाधा झाल्यामुळे 16 वर्षीय तरुणीचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, तरुणीचा मृत्यू शिगेला संसर्गामुळे झाल्याचे निदान डॉक्टरांनी केले आहे. ‘शिगेला संसर्ग’ काय आहे, तो प्राणघातक ठरु शकतो काय, हे जाणून घेऊया.

केरळमध्ये अन्नातून विषबाधा झाल्यामुळे 16 वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला. तर 40 हून अधिक नागरिकांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. मृत तरुणीला शिगेला संसर्ग झाल्याची बाब समोर आली आहे. डॉक्टरांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. केरळ हाय कोर्टाने या प्रकरणाची दखल घेत प्रशासनाला जाब विचारला आहे. दुसरीकडे या प्रकरणी पोलिसांनी हॉटेल मालकासह कर्मचाऱ्यांना अटक केली आहे.

शिगेला संसर्ग झालेल्या रुग्णांना अतिसारची (Diarrhea) बाधा होते. ताप आणि ओटीपोटात खूप वेदना होतात. तसेच या विषाणूची लागण झालेला व्यक्ती आधीच आजारी असेल तर त्याच्यावर ताबडतोब उपचार करणे गरजेचे असते

‘शिगेला’ आतड्यावर हल्ला करतो…
शिगेला हा एक जीवाणू असा आहे की तो आतड्यावर हल्ला करतो ज्यामुळे अतिसार, पोटदुखी आणि ताप येतो. यूएस सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अॅण्ड प्रिव्हेन्शनच्या मते, ‘कुणालाही आजारी पाडण्यासाठी जिवाणूंची किमान संख्याही पुरेशी आहे.’ हा संसर्ग त्याच्या रुग्णाच्या सामानाशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संपर्काने सहज पसरतो. तसेच याशिवाय दूषित पाण्यात पोहोणे किंवा आंघोळ केल्यानेही हा धोकादायक जीवाणू तुमचा बळी घेऊ शकतो.

शिगेला प्राणघातक आहे का?
शिगेलोची लागण झाल्यानंतर रुग्णाचा मृत्यू होतो का? असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. रुग्णाची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होत नाही तोपर्यंत या मृत्यू होत नाही, असे डॉक्टरांनी सांगितले आहे.

संसर्गापासून स्वत:चं रक्षण कसे कराल…
शिगेला संसर्गापासून स्वत:चं रक्षण करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे अन्न खायचे किंवा पाणी वापरण्यापूर्वी आवश्यक खबरदारी घेणे गरजेचे आहे.

काय कराल?
– जेवण करण्यापूर्वी आणि नंतर हात चांगले धुवावे.
– पिण्याचे पाणी स्वच्छ ठेवा. ताजी फळे आणि भाज्या आहारात वापरा.
– दूध, चिकन आणि मासे यासारखे नाशवंत पदार्थ योग्य तापमानात ठेवा आणि ते योग्य प्रकारे शिजवा.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -