Sunday, December 22, 2024
Homeमहाराष्ट्रतवेरा कार-ट्रकचा भीषण अपघात, 7 जणांचा जागीच मृत्यू

तवेरा कार-ट्रकचा भीषण अपघात, 7 जणांचा जागीच मृत्यू

नागपूरमध्ये भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. नागपूर उमरेड मार्गावरील उमरगाव फाट्याजवळ तवेरा कार ट्रकवर आदळली. हा अपघात इतका भीषण होता की अपघातामध्ये तवेरा कारमधील 7 जणांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातामध्ये एक लहान मुलगी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर उपचार सुरु आहेत. या अपघाताचा तपास नागपूर पोलिसांकडून सुरु आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर उमरेड मार्गावर भीषण अपघाताची घटना घडली. शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास हा अपघात झाला. विहीरगाव जवळील अड्याली फाट्याजवळ असलेल्या राम कुलर कंपनीजवळ तवेरा कार ट्रकवर आदळली. तवेरा कारमधून नागपूरमधील सात जण उमरेड मार्गावरून जात होते. या मार्गावरुन ट्रक जात होता त्याचवेळी तवेरा कारचा वेग मर्यादित वेगापेक्षा जास्त होता. चालकाने ट्रकला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला पण तवेरा कारने ट्रकला जोरदार धडक दिली.

हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये तवेरा कारचा चक्काचूर झाला. अपघातामध्ये तवेरा कारमधील सात जणांचा जागीच मृत्यू झाला तर एक लहान मुलगी गंभीर जखमी झाली. तिच्यावर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर हुडकेश्वर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघात झाल्यावर एका तासानंतर पोलिसांना माहिती मिळाली. या मार्गावरुन जाणाऱ्या प्रवाश्यांनी पोलिसांना ही माहिती दिली. तोपर्यंत लहान मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या अपघातातील मृतांची ओळख पटलेली नाही. जखमी चिमुकलीकडून माहिती काढण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला पण तिच्याकडून काहीच माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -