Monday, December 23, 2024
HomeमनोरंजनKatrina Kaif ने स्विमिंग पूलमध्ये Vicky Kaushal सोबत केला रोमान्स

Katrina Kaif ने स्विमिंग पूलमध्ये Vicky Kaushal सोबत केला रोमान्स

बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal ) काही महिन्यांपूर्वीच विवाहबंधनात अडकले. मागच्या वर्षी डिसेंबरमध्ये दोघांनी लग्न केले. लग्न केल्यापासून कतरिना आणि विकी नेहमी सोशल मीडियावर चर्चेत असतात. कतरिना कैफ सोशल मीडियावर आपला पती विकी कौशलसोबतचे खूप कमी फोटो शेअर करत असते. नुकताच कतरिनाने विकी कौशलसोबतचा रोमँटिक फोटो शेअर केला आहे. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

कतरिनाने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर विकीसोबतचा रोमँटिक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये कतरिना कैफ आणि विकी कौशल विकेंडचा मूड आणखी रोमँटिक बनवताना दिसत आहे. या फोटोमध्ये दोघेही स्विमिंग पूलमध्ये उभे राहिलेले दिसत आहे. दोघेही खूपच हॉट आणि बोल्ड दिसत आहेत.

बॉलिवूडची चिकनी चमेली कतरिनाने यापूर्वीही विकीसोबतचा असाच एक रोमँटिक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. नुकताच शेअर केलेल्या या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की दोघेही स्विमिंग पूलमध्ये उभे असून पाण्यात रोमान्स करत असल्याचे दिसत आहे. कतरिनाने विकीला घट्ट मिठी मारल्याचे दिसत आहे. या फोटोमध्ये तिने पांढऱ्या रंगाची मोनोकिनी घातली आहे. तर विकी शर्टलेस आहे. कतरिनाने विकीला मिठी मारत कॅमेऱ्यासमोर पोज देताना दिसत आहे.

हा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत कतरिनाने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘मी आणि माझे’. हा फोटो पाहून कतरिनाचे चाहते खूप कमेंट करत आहेत. एका युजरने लिहिले आहे की, ’मेड फॉर इच अदर!.’ तर आणखी एका युजरने लिहिले आहे की, ‘तू आणि तुझा.’ दरम्यान, करतिना कैफच्या वर्क फ्रंटबद्दल सांगायचे झाले तर, कतरिना कैफ ‘टायगर 3’ चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात तिने सलमान खानसोबत स्क्रीन शेअर केली आहे. याव्यतिरिक्त ती सिद्धांत चतुर्वेदी, इशान खट्टरसोबत ‘फोन भूत’ मध्ये दिसणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -