ताजी बातमी ऑनलाईन टीम
रविवारी 8 मे रोजी मदर्स डे साजरा केला जाणार आहे. महाराष्ट्रात हा दिवस मातृ दिन (Matru Din 20225) म्हणून देखील साजरा केला जातो. जिने आपल्याला जन्म दिला आणि हे सुंदर जग दाखवले त्या आईची कृतज्ञता व्यक्त करण्याचा आज दिवस आहे. आपल्यावर निखळ आणि निरपेक्ष प्रेम करणाऱ्या आईवरील आपले प्रेम व्यक्त करण्याचा आज दिवस आहे. आपण कुठेही असलो तरी आपल्या सुख-दु:खाची जिला चाहूल लागते त्या आईजवळ बसून आज तू माझ्यासाठी किती महत्त्वाची आहे हे व्यक्त करण्याचा दिवस आहे. आज या दिननिमित्त आम्ही तुमच्यासाठी काही खास शुभेच्छा संदेश घेऊन आलो आहोत. ते पाठवून तुम्ही देखील आज आईला शुभेच्छा देऊ शकता…
मदर्स डे निमित्त पाठवा हे मराठी शुभेच्छा संदेश
आई तुझ्या चरणी वैकुंठ धाम, तूच माझा पांडुरंग
आई उच्चारानेच होईल सगळ्या वेदनांचा अंत..
मातृदिनाच्या शुभेच्छा!
देवा जिने जन्म देऊन घडवलं मला
सदैव सुखी ठेव माझ्या माऊलीला
मातृदिनाच्या खूप खूप शुभेच्छा!
मातृदिनाच्या शुभेच्छा!
आई म्हणजे मंदीराचा उंच कळस,
अंगणातील पवीत्र तुळस
भजनात गुणगुणावी अशी संतवाणी,
वाळवंटात प्याव अस थंड पाणी
आई म्हणजे आरतीत वाजवावी अशी,
वाळवंटात प्याव अस थंड पाणी,
आई म्हणजे आरतीत वाजवावी अशी लयबध्द टाळी
आणी वेदनेनंतरची सर्वात पहीली आरोळी.
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
तुम्ही कितीही मोठे झालात तरी
आईसाठी तुम्ही कायम लहान असता ..
तिच्यासाठी तुम्ही कायम तिचे बाळ असता..
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
आई म्हणजे मंदिराचा उंच कळस,
आई म्हणजे अंगणातील पवित्र तुळस,
आई म्हणजे भजनात गुणगुणावी अशी संतवाणी,
आई म्हणजे वाळवंटात प्यावे असे थंड पाणी…
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
आई लेकराची माय असते,
वासराची गाय असते,
दुधाची साय असते,
लंगड्याचा पाय असते,
धरणीची ठाय असते,
आई असते जन्माची शिदोरी, सरतही
नाही उरतही नाही..!
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !