Monday, December 23, 2024
Homeब्रेकिंगएकतर्फी प्रेमातून 7 जणांचा जीव घेणाऱ्या मातेफिरुला अटक

एकतर्फी प्रेमातून 7 जणांचा जीव घेणाऱ्या मातेफिरुला अटक

इंदोरमध्ये एकतर्फी प्रेमातून तरुणाने टोकाचे पाऊल उचलत तरुणीच्या स्कूटीला आग लावली. पण या आगीमध्ये तरुणी बचवली. पण तिच्या कुटुंबातील इतर सात जणांचा आगीमध्ये होरपळून मृत्यू झाला. या घटनेमुळे इंदूरमध्ये एकच खळबळ उडाली. अखेर सीसीटीव्हीच्या मदतीने अवघ्या 24 तासांत पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळ्या आहेत. संजय उर्फ शुभम दीक्षित असे आरोपीचे नाव आहे.

इंदुरच्या स्वर्ण बाग कॉलनीमध्ये ही घटना घडली होती. पार्किंगमध्ये असलेल्या स्कुटीला आग लागून या आगीमध्ये होरपळून एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू झाला. या घटनेत सुरुवातीला नेमकं काय झाले हे कळाले नाही. शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला. पण नंतर जी माहिती समोर आली त्यामुळे सर्वांना धक्का बसला. एकतर्फी प्रेमातून आरोपीने तरुणीच्या स्कुटीला आग लागली आणि ही घटना घडली असल्याचे समोर आले.

आरोपी संजय राहत असलेल्या परिसरात राहणाऱ्या एका तरुणीशी त्याचे प्रेमसंबंध होते. त्याने या तरुणीवर बराच पैसा खरच केला. नंतर ही तरुणी त्याला मुर्ख बनवत असल्याचे त्याच्या लक्षात आले. ती अनेक जणांच्या संपर्कात असल्याचे त्याच्या लक्षात आल्यानंतर त्याने तिच्याशी बोलणे सोडून दिले. पण तरी सुद्धा ती त्याचा पाठलाग करु लागली. तिला अद्दल शिकवावी यामुळे आरोपीने तिची स्कुटी जाळण्याचा कट रचला. पण त्याने केलेल्या कृत्यामुळे मोठे अग्निकांड होऊन तरुणीच्या कुटुंबातील निरपराध सात जणांचा मृत्यू झाला.

सीसीटीव्ही फूटेजच्या आधारे पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळ्या. शुक्रवारी मध्यरात्री तीनच्या सुमारास आरोपी तरुणी राहत असलेल्या पार्किंगमध्ये आला. त्याने स्कुटीतून पेट्रोल काढले आणि आग लावली. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला. त्यानंतर आरोपी तिथून फरार झाला. पण काही वेळानंतर तो त्या ठिकाणी परत आला आणि त्याने सीसीटीव्ही कॅमेरा तोडण्याचा प्रयत्न केला. ऐवढं नाही तर त्याने वीजेच्या मीटरसोबतही छेडछाड केली. त्यामुळे तरुणी राहत असलेल्या इमारतीतील सीसीटीव्ही जळाले. पण पोलिसांनी इतर इमारतीमध्ये लावलेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीला अटक केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -