रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत सातत्याने चढ-उतार पाहायला मिळत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर वाढले असून देशात पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी करण्यात आले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर प्रतिबॅरल 113 डॉलरवर जाऊन पोहोचले आहेत. एकीकडे कच्च्या तेलाच्या दरात सातत्याने वाढ होत असताना देशात मात्र आजही पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत.
ग्लोबल मार्केटमध्ये कच्च तेल महाग होत आहे. त्यानंतरही पेट्रोल (Petrol Price) – डिझेलचे दर स्थिर आहेत. सर्वसामान्यांना काहीसा दिलासा मिळाला असला तरीदेखील पुन्हा एकदा पेट्रोल-डिझेलच्या दरांत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
शहरं पेट्रोलच्या किमती (प्रति लिटर) डिझेलच्या किमती (प्रति लिटर)
मुंबई 120.51 104.77
दिल्ली 105.41 96.67
चेन्नई 110.85 100.94
कोलकाता 115.12 99.83
हैद्राबाद 119.49 105.49
कोलकाता 115.12 96.83
बंगळुरू 111.09 94.79