ताजी बातमी ऑनलाईन टीम
राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) मुंबईत सोमवारी सकाळी अनेक ठिकाणी छापेमारी केली. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या (Underworld Don Dawood Ibrahim) शूटर्ससह हवाला ऑपरेटर्स NIA च्या निशाण्यावर आहेत. NIA च्या पथकाने नागपाडा, गोरेगाव, बोरीवली, सांताक्रूझ, मुंब्रा, भेंडी बाजारासह तब्बल 20 ठिकाणी छापेमारी करत कारवाई केली.
NIA च्या अधिकाऱ्याने या कारवाईत सलीम फ्रूट याला ताब्यात घेतले आहे. सलीम फ्रूट हा दाऊद इब्राहिमचा पंटर असल्याची NIA ला संशय आहे. NIA ने सलीमकडून अनेक महत्त्वाचे दस्ताऐवज जप्त केल्याची माहिती देखील मिळाली आहे.
मुंबईतील अनेक हवाला व्यापारी आणि ड्रग तस्कर आजही दाऊद इब्राहिमच्या इशाऱ्या केली जाते. मुंबईत आजही दाऊदचे अनेक पंटर्स आहेत. या संदर्भात फेब्रुवारीमध्ये NIA ने गुन्हे दाखल केले होते. आज अनेक ठिकाणी छापे टाकण्यात आली आहे. NIA चे अधिकारी पुढील तपास करत आहेत.