Sunday, August 3, 2025
Homeब्रेकिंगपिकअपच्या अपघातात ४ वर्षीय चिमुकलीसह तिघे मृत्यूमुखी

पिकअपच्या अपघातात ४ वर्षीय चिमुकलीसह तिघे मृत्यूमुखी

दुर्गावाडी (ता. जुन्नर) येथून देवीचे दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांच्या पीकअप गाडीचा गणेशखिंडीत अपघात झाला. मंगळवारी (दि. १०) रात्री १० वाजेच्या सुमारास येथील धोकादायक वळणावर कोटमवाडीच्या भाविकांची जीप दरीत कोसळली. या अपघातात तिघे मृत्यूमुखी पडले. यामध्ये ४ वर्षीय चिमुकलीचा समावेश आहे.

विघ्नेश विलास सांगडे (वय ४), शांताराम दादाभाऊ भारती (वय ४५) व बारकाबाई महादू भोईर (वय ५८) (रा. सर्वजण सितेवाडी-कोटमवाडी, ता. जुन्नर) अशी या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या भाविकांची नावे आहेत.

याबाबतचे वृत्त असे की, दुर्गावाडी (ता. जुन्नर) येथून देवीचे दर्शन घेऊन भाविक पिकअप वाहनाने परत येत होते. यावेळी हे वाहन गणेशखिंड (ता. जुन्नर) येथील कडे तोडून दरीत कोसळले. यामध्ये तिघांचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे पिकअप वाहन दरीत कोसळल्यानंतर ते दरीतील झाडांना अडकले. त्यामुळे आणखी जीवीत हानी टळली असे या अपघातातून वाचलेल्यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -