मिरज / प्रतिनिधी
सांगली मध्ये दिनांक १४ रोजी शनिवारी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्त शिवपुत्र ग्रुपकडून रॅली काढण्यात येणार असून या रॅलीमध्ये सर्व धर्मीय नागरिकांना आणि शिवभक्तांना,युवकांना रॅलीमध्ये सामिल होण्याचे आवाहन शिवपुत्र ग्रुपचे अध्यक्ष स्वप्नजीत पाटील यांनी केले आहे.
तसेच ही रॅली दिलीप पाटील यांच्या उपस्थितीत होणार असून ह्या रॅलीला जास्तीत जास्त प्रमाणात तरुणांनी उपस्थित राहून ह्या रॅलीची शोभा वाढवावी.ही रॅली पुष्पराज चाैक येथून प्रारंभ होऊन या रॅलीची सांगता विश्रामबाग चाैक येथे होऊन विश्रामबाग चौकामध्ये महाप्रसादाचे आयोजन केले आहे.या महाप्रसादाचाही लाभ घ्यावा असे आवाहन शिवपुत्र ग्रुपकडून करण्यात आले आहे.ही रॅली १४ मे २०२२ रोजी सकाळी १० वाजता छत्रपती संभाजी महाराज यांचे फोटो पुजन करुन १०:१५ ला प्रारंभ होईल.