Monday, July 28, 2025
Homeतंत्रज्ञानApple चे ‘हे’ खास व प्रसिद्ध प्रोडक्ट आता होणार बंद

Apple चे ‘हे’ खास व प्रसिद्ध प्रोडक्ट आता होणार बंद

Apple ही अशी कंपनी आहे ज्यांचे सगळेच प्रोडक्टस लोकांमध्ये सहजपणे लोकप्रियता मिळवतात. असेच एक प्रोडक्ट आता Apple बंद करत आहे. 20 वर्षांपूर्वी launch केलेले हे प्रोडक्ट एकेकाळी सगळ्यांच्या हातात दिसायचे. मात्र आता त्याचा चाहता वर्ग आणि खप कमी झाल्याने Apple ने प्रोडक्ट बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. Apple कंपनीने 20 वर्षांपूर्वी आलेले म्यूज़िक स्ट्रीमिंग डिवाइस iPod बंद करण्याची घोषणा केली आहे.

iPod साधारण 20 वर्षांपूर्वी launch करण्यात आला होता आणि विशेष गोष्ट म्हणजे हे सगळ्याच संगीत प्रेमींसाठी आवडते स्ट्रीमिंग संगीत गॅझेट बनले होते. न्यूजरूम वेबसाइटनुसार, कंपनीचे आता आलेले नवीन व्हर्जन iPod Touch हे फक्त पुरवठा संपेपर्यंत उपलब्ध असेल.
आयफोन निर्मात्यांनी घोषित केले आहे की, ते आता iPod टच बंद करणार आहेत. 21 वर्षांहून अधिक काळ, Apple ने iPod चे अनेक व्हर्जन लाँच केले परंतु Apple च्या बाकीच्या प्रोडक्टस मुळे हळूहळू iPod ला फटका बसू लागला. विशेषत: iPhone मुळे iPod मागे फेकले गेले.

Apple iPod Touch हे एकमेव मॉडेल सध्या उपलब्ध आहे आणि भारतात त्याची किंमत 19,600 रुपये आहे. हे मॉडेल सहा रंगांमध्ये येते – स्पेस ग्रे, सिल्व्हर, पिंक, ब्लू, गोल्ड आणि प्रॉडक्ट रेड तसेच यात तीन वेगवेगळे व्हर्जन आहेत. ज्यांची स्टोरेज क्षमता 32GB, 128GB आणि 256GB एवढी आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -