Monday, July 28, 2025
Homeमनोरंजनजॅकलिनला विदेशात जायचंय, न्यायालयाकडे केला अर्ज

जॅकलिनला विदेशात जायचंय, न्यायालयाकडे केला अर्ज

घोटाळेबाज सुकेश चंद्रशेखर याच्याशी निकटचे संबंध असल्यावरून अडचणीत आलेली अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस हिने 15 दिवस विदेशात जाण्यासाठी स्थानिक न्यायालयात विनंती अर्ज दाखल केला आहे. अबूधाबी येथे होणाऱ्या आयफा पुरस्कार कार्यक्रमासाठी विदेशात जाण्यास परवानगी दिली जावी, असे जॅकलिनने अर्जात म्हटले आहे.

सुकेश चंद्रशेखर याने घोटाळ्यातली मोठी रक्कम तसेच अत्यंत महागड्या भेटवस्तू जॅकलिनला दिल्याचा तपास संस्थांचा संशय आहे. यावरून सक्तवसुली संचालनालयाने अनेकदा जॅकलिनची चौकशीदेखील केलेली आहे. काही दिवसांपूर्वीच ईडीने जॅकलिनच्या सुमारे सव्वा सात कोटी रुपयांच्या मालमत्तेवर टाच आणली होती. केवळ अबुधाबीच नव्हे तर फ्रान्स आणि नेपाळला जाण्याची परवानगी देखील जॅकलिनने न्यायालयाकडे मागितली आहे. सुकेशसोबत असलेल्या संबंधांची चौकशी सुरु असल्याने तपास संस्थांनी जॅकलिनला देश सोडण्यास मनाई केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -