Tuesday, July 29, 2025
Homeक्रीडाCSK ला मोठा धक्का; रवींद्र जडेजा आयपीएल 2022 मधून बाहेर?

CSK ला मोठा धक्का; रवींद्र जडेजा आयपीएल 2022 मधून बाहेर?

ताजी बातमी ऑनलाईन टीम

चेन्नई सुपर किंग्जला (csk news) एक मोठा जडेजाच्या रूपाने मोठा झटका बसू शकतो. जो स्पर्धेतून बाहेर जाऊ शकतो. सुत्राच्या माहितीनुसार रवींद्र जडेजाला दुखापतीमुळे आयपीएल 2022 मधून बाहेर जावे लागू शकते. चेन्नईच्या संघात यापूर्वीही अनेक बदल करण्यात आले आहेत. दीपक चहरही दुखापतीमुळे आधीच स्पर्धेतून बाहेर पडला आहे. अशाप्रकारे सीएसकेसाठी हा दुसरा मोठा धक्का असू शकतो.



या सामन्यात सीएसकेला पराभवचा सामना करायला लागला. दुखापतीमुळे जडेजाला कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यातून बाहेर व्हावे लागले होते. त्या सामन्यात चेन्नईने दमदार विजय मिळवला आहे

दुखापतीमुळे रवींद्र जडेजाला आयपीएल 2022 मधून बाहेर पडावे लागेल. रवींद्र जडेजाचे काही दिवसांपासून दुखापतीचे मूल्यांकन केले जात आहे, पण दुखापतीमध्ये कोणतीही सुधारणा दिसत नाही. आता ही स्पर्धा शेवटच्या टप्प्यात आली असून सीएसकेचा पुढील सामना मुंबई इंडियन्सशी खेळला जाणार आहे. अशा परिस्थितीत संघला आणखी एक धक्का बसू शकतो. CSK ला IPL 2022 च्या प्लेऑफमध्ये पोहोचण्याची संधी आहे, परंतु RCB आणि राजस्थान रॉयल्सने जर पुढील सामना जिंकला तर चेन्नईचे बाहेर पडणे जवळपास निश्चित होईल.

आयपीएल 2022 मध्ये रवींद्र जडेजा दमदार फॉर्मसह प्रवेश करणार होता. याच कारणामुळे त्याला CSK चे कर्णधारपद मिळाले होते, पण त्याची कामगिरी आणि संघाची कामगिरी खराब होती. अशा परिस्थितीत त्याने पुन्हा एमएस धोनीकडे कर्णधारपद सोपवले. कर्णधारपद सोडल्यानंतर तो दोन सामन्यांत खेळला, मात्र दुसऱ्या सामन्यात झेल घेताना तो जखमी झाला आणि आता तो स्पर्धेतून बाहेर होण्याच्या मार्गावर आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -